MUHS Election : राज्यात 42 मतदान केंद्रांवर आरोग्य विद्यापीठाची निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MUHS latest marathi news

MUHS Election : राज्यात 42 मतदान केंद्रांवर आरोग्य विद्यापीठाची निवडणूक

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी शुक्रवारी (ता. १७) निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यभरात एकूण ४२ मतदान केंद्र निर्देशित केलेली आहेत. (Election of MUHS Health University at 42 polling stations in state nashik news)

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी ही माहिती दिली. ते म्‍हणाले, की विद्यापीठ अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळे आदी प्राधिकरणांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी राज्यातील ४२ ठिकाणी मतदान केंद्र निर्देशित केले आहेत.

यामध्ये मुंबईत भायखळा, परळ, सायन, ठाणे, खारघर (नवी मुंबई), तसेच चिपळून (रत्नागिरी), खेड, अलिबाग, सावंतवाडी, पुणे, निगडी, मिरज, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, संगमनेर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, लातूर, आंबेजोगाई, सेवाग्राम-वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोंदिया येथील मतदान केंद्रांचा समावेश आहे. विद्यापीठातर्फे प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची नियुक्ती केली असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.