Electric Toys : उद्यानांत आता चिमुकल्यांसाठी इलेक्ट्रिक खेळणी! 3 उद्यानात प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग

Electric Toys
Electric Toysesakal

Electric Toys : शहरातील महापालिकेच्या काही उद्यानात इलेक्ट्रिक खेळणी बसविण्याचे महापालिकेचे नियोजन सुरू आहे. ठराविक उद्यानाचा महापालिकेकडून कायापालट सुरू आहे. त्यात इलेक्ट्रिक खेळणीचे नियोजन आहे. सुरवातीला तीन उद्यानात हा प्रयोग राबविला जाणार आहे. (Electric toys for toddlers now in parks by nmc 3 Experiments on pilot basis in park nashik news)

प्रायोगिक तत्त्वावर खासगी प्रायोजकांच्या मदतीने शहरातील तीन उद्यानांत चिमुरड्यांच्या मनोरंजनासाठी इलेक्ट्रिक खेळण्या बसविण्याचे नियोजन आहे. नाशिक रोडला दोन आणि इंदिरानगरमधील एक याप्रमाणे तीन उद्यान विकसित करण्याचे नियोजन आहे.

शहरातील अनेक उद्यानातील खेळण्या, बाकडी तुटले आहे. त्यातून लहानग्यांना दुखापत झाल्या आहेत. खासगी ठेकेदारांना ठेके दिले असल्याने ठेकेदार सांगतील तेच उद्यानाचे चित्र आहे. महापालिकेकडून नियमित पाहणी होत नाही.

नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. चिमुरड्यांसाठी असलेल्या उद्यानात मोठ्यांचीच मर्जी चालते. अनेक ठिकाणी सायंकाळनंतर मद्यपी ताबा घेतात, तर काही ठिकाणी दिवसभर किशोरवयीन मुलांचे क्रिकेटचे खेळ रंगतात. त्यामुळे उद्यानात महिला आणि मुलांना खेळायला मिळत नाही.

महापालिका क्षेत्रात ४२९ पेक्षा अधिक उद्याने आहेत. त्यापैकी दोनशे उद्यानांची देखरेख उद्यान विभाग, तर उर्वरित उद्यानांची देखभाल ठेकेदारांमार्फत केली जाते. उद्यानामुळे ज्येष्ठ नागरिक, लहानगे यांचे मनोरंजन व विरंगुळा व्हावा हा उद्देश असला तरी सद्यःस्थितीत सर्वच उद्यानांची अवस्था बिकट आहे.

सर्वाधीक उद्यान असलेल्या जेल रोड आणि नाशिक रोड भागात उद्यानांची स्थिती जास्त बिकट आहे. त्या खालोखाल सिडको भागात दुरवस्था आहे. मात्र आता त्यापैकी अपवादांच्या दोन चार मोठ्या उद्यानातील चित्र बदलण्याचे नियोजन महापालिकेच्या उद्यान विभागाने सुरू केले आहे.

त्यात, खासगी प्रायोजकांच्या मदतीने ६ उद्यानांत इलेक्ट्रिक खेळणी, ट्रेन बसविण्याचे काम सुरू आहे. नाशिक रोडला सोमानी उद्यान, तर इंदिरानगरमधील सिटी गार्डनचा समावेश आहे. प्रायोजकाला खेळणी उभारण्यासाठी उद्यानातील जागा भाड्याने दिली जाणार आहे. भाड्याच्या जागेत खेळणी उभारून त्या ठिकाणी तिकीट आकारले जाणार आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Electric Toys
Success Story : कमी उंचीचा अडसर झुगारून तपानंतर यशाला गवसणी! मेहनतीने पोलीस होण्याचे स्वप्न केले पूर्ण

बिल काढण्यापुरतच

मार्च २०२२ ला महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणूका होणार म्हणून २०२१ ला उद्यानांची भरमसाट काम धरली गेली. पण महापालिकेच्या निवडणूका लांबल्या आणि पाठोपाठ लोकप्रतिनिधींची राजवट नसल्याने २०२१ सालच्या उद्यानांची कामे पूर्ण नाहीत.

नव्याने उद्यानांच्या देखभाल- दुरुस्तीची कामे धरलेल्या मागील आर्थिक वर्षात जेल रोडला काही उद्यानात साधे पथदीप बसविलेले नाहीत. बिल निघण्यापुरता उत्साह बिल मंजुरीनंतर ठेक्यातील नियोजित कामे तरी झाली का, हे पाहायला कुणाला वेळ नाही. प्रभागांना नगरसेवकच नसल्याने जाब विचारायला कुणी नाही. असेही विरोधाभासाचेही चित्र आहे.

तिकीट आकारणी

उद्यानात मुलांच्या रेल्वेगाड्यासह इलेक्ट्रिक खेळणीसाठी मुलांकडून शुल्क आकारले जाणार आहे. उद्यानाची जागा भाड्याने देऊन त्यातून प्रायोजकांनी व्यवसाय करावा आणि महापालिकेला कररूपाने पैसे द्यावे असे साधारण धोरण आहे.

दरम्यान तिकीट आकारणी होणार असली तरी ते नाममात्र असेल असा उद्यान विभागाचा दावा आहे. आता नाममात्र म्हणजे नेमके किती याचे उत्तर मिळायला मात्र चिमुरडे आणि त्यांच्या पालकांना उद्यानात इलेक्ट्रिक खेळणी सुरू व्हायची वाट पहावी लागणार आहे.

Electric Toys
Success Story : वस्तीशाळेचा विद्यार्थी बनला कृषी अधिकारी! अंगूलगाव ग्राम पंचायततर्फे सत्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com