नाशिक: वीज कायदा २००३ व ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नुसार वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीची सेवा निवडण्याचा अधिकार आहे. नाशिकमधील वीज ग्राहकांनाही मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर शहरांप्रमाणे टाटा वीज कंपनीची सेवा मिळावी, अशी मागणी वीज ग्राहकांनी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतच्या वतीने आयोजित गोटखिंडीकर सभागृह, गंगापूर रोड येथील वीज ग्राहक मेळाव्यात केली.