electricity strike
sakal
नाशिक रोड: निर्मिती, पारेषण व वितरण या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खासगीकरणाच्या प्रक्रियेचा विरोध आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीने राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस देऊन गेल्या पंधरा दिवसांपासून क्रमबद्ध आंदोलन सुरू असून, शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने ९ ऑक्टोबरपासून ७२ तासांचा संप पुकारण्यात येणार आहे.