Nashik News: 24 तास उलटत नाही, तोच वीजपुरवठा खंडित

Nashik news
Nashik newsesakal

नाशिक : शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा बाधित होतो. त्याअनुषंगाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने महावितरणला किमान अचानक वीजपुरवठा खंडित करू नये, अशी विनंती करून चोवीस तास उलटत नाही तोच मुकणे धरणावरील २२० किलोवॅट क्षमतेचे फिडर बंद पडल्याचा निरोप पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाल्यानंतर धावपळ उडाली.

परंतु, पुन्हा वीजपुरवठा सुरळीत असल्याचा निरोप पडल्यानंतर अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. यानिमित्ताने मात्र वीज वितरण विभागाच्या अनियंत्रित कारभाराची चर्चा सुरु आहे.

Nashik news
Nashik ZP News : तांत्रिक मान्यतेअभावी जिल्ह्यातील 3 कोटींच्या अंगणवाड्या रखडल्या!

शहराला गंगापूर मुकणे व दारणा या तीन धरणातून प्रामुख्याने पाणीपुरवठा होतो. तीन धरणातून कच्च्या स्वरूपात पाणी उचलले जाते. जलशुद्धीकरण केंद्रात पाणी येते. जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केल्यानंतर जलवाहिन्यांमध्ये पोचते व जलवाहिन्यांमधून घरोघरी पाण्याचे वितरण होते.

या सर्व प्रक्रियेमध्ये जलशुद्धीकरण केंद्रावरील वीजपुरवठा खंडित झाल्यास जलकुंभापर्यंत पाणी पोचण्यात अडचणी निर्माण होतात. मागील २८ दिवसांमध्ये ६१ वेळा वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने महापालिकेने महावितरणशी संपर्क साधून वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी महापालिकेला आगाऊ कल्पना द्यावी.

Nashik news
Nashik News : उत्तर महाराष्ट्रात हवेच्या गुणवत्तेची आता मोबाईल व्हॅनद्वारे तपासणी

जेणेकरून पाणीपुरवठ्या संदर्भात स्वतंत्र व्यवस्था करता येईल, असे कळविले. परंतु, चोवीस तासातच वितरण कंपनीच्या ढिसाळ कामाचा फटका पाणीपुरवठा विभागाला सहन करावा लागला. मुकणे धरण येथील २२० किलोवॅटचे विद्युत फिडर बंद पडल्याचा संदेश भ्रमणध्वनीवर आल्याने पुढील दोन दिवसाचा पाणीपुरवठा विस्कळित होईल.

या भीतीने मुकणे धरणावर फोन केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत असल्याचे कळले व वीज वितरण कंपनीनेदेखील पुरवठा सुरळीत असल्याचा खुलासा केल्यानंतर अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

Nashik news
Nashik Crime News : चोरट्यांचा द्राक्षांवर डल्ला; कोकणगावच्या शेतकऱ्याचे नुकसान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com