तब्बल 50 वर्षांनंतर या पाड्यावर पोचली वीज

देवळाली मतदारसंघातील देवरगाव परिसरातील वैष्णवनगर (वैसनपाडा) येथील ग्रामस्थांनी पन्नास वर्षे अंधारात काढले.
Power Supply News
Power Supply Newssakal
Updated on

नाशिक रोड : देवळाली मतदारसंघातील देवरगाव परिसरातील वैष्णवनगर (वैसनपाडा) येथील ग्रामस्थांनी पन्नास वर्षे अंधारात काढले. मात्र, आमदार सरोज अहिरे यांच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरू झाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

तालुक्यातील देवरगाव हद्दीतील वैष्णव नगर याठिकाणी गेल्या ५० वर्षांपासून लोकवस्ती तयार झाली आहे. मात्र, तेथे वीज नसल्याने लोकांची मोठी गैरसोय होत होती. कित्येक वर्षांपासून हा प्रश्न दुर्लक्षित होता. मतदारसंघातील इतर विकास कामांबरोबरच या ठिकाणी विजेचा प्रश्न गांभीर्याने घेत आमदार सरोज अहिरे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना या भागात वीजपुरवठा सुरू करण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार अधिकाऱ्यांनी येथे वीजपुरवठा सुरू केला.

Power Supply News
अग्निपथच्या आंदोलनाचा फटका : सलग दुसऱ्या दिवशी 10 रेल्वे रद्द

आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते वीजपुरवठा सुरू करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने, तालुका कार्याध्यक्ष निवृत्ती कापसे, पंचायत समितीचे माजी उपसभापती ढवळू फसाळे, कैलास बेंडकुळे, सरपंच काशिनाथ मोंढे, दिनकर मोंढे, अविनाश कसबे, विशाल गायकर, उपसरपंच प्रकाश मोंढे, मंगळू पिंपळके, लक्ष्मण भोये, सागर पिंपळके व ग्रामस्थ उपस्थित होते.

Power Supply News
अग्निवीर भरतीसाठी भारतीय लष्कराकडून अधिसूचना जारी; जुलैपासून नोंदणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Vidhan Parishad Election
What caused traffic congestion at Dwarka Chowk?
Declining rainy days impact on Nashik agriculture
Onion Purchase Irregularities Worth ₹54 Crore Surface; Investigation Demand Grows
Marathi News Esakal
www.esakal.com