सहा लाखांची वीजचोरी
अख्तराबादला उघडकीस
मालेगाव : शहरातील अख्तराबाद भागात सव्वा लाखाचा वीज चाेरीचा प्रकार उघडकीस आला आहे. अजमुद्दीन मोहम्मद सामी, अख्तरुल इमान शौकत इकबाल, मेहताब आलम इस्त्राईल, अश्पाक अंजुम जहीर अहमद आदींसह नऊ जणांनी वीज मीटर नसताना जवळील एलटी पोलवरुन थेट वीजपुरवठा घेऊन ८ हजार २८० युनीट वीज चोरी करत १ लाख २० हजार ३३८ रुपयांची ठकबाजी केली. मालेगाव वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता ललित पवार (वय २८) यांच्या तक्रारीवरुन नऊ जणांविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----
म्हाळदे शिवारात
पतीची मारहाण
मालेगाव : शहरातील म्हाळदे शिवारात पत्नीने जेवण आणले नाही म्हणून पतीने तिला धारदार हत्याराने छातीवर, पोटावर, हातावर व पाठीवर वार करत गंभीर जखमी केले. अरसिया शेख अमजद (वय २६, रा. गुलशने मदिना) हिच्या तक्रारीवरुन पती अमजद शेख व त्याचा मित्र नुर अली शेख या दोघांविरुध्द पवारवाडी पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----
गिगाव शिवारात
बेवारस मृतदेह
मालेगाव : तालुक्यातील गिगाव शिवारातील फाट्याजवळ ४० वर्षीय पुरुषाचा बेवारस मृतदेह मिळून आला. तालुका पोलिसांनी रुग्णवाहिकाचालक बंटी शिंदे यांच्या मदतीने मृतदेह सामान्य रुग्णालयात आणला. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या पुरुषाची ओळख पटू शकली नाही. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
----
दोन दुचाकींची
धडक; एक ठार
मालेगाव : मालेगाव - सटाणा रस्त्यावरील सोयगाव जवळील कलंत्री गॅस एजन्सीजवळ दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार विजय पंडीत गायकवाड (वय २२, रा. चव्हाणनगर, सोयगाव) हा गंभीर जखमी झाला. त्याला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. ओम जाधव यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. छावणी पोलिस ठाण्यात तुर्त आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. धडक देणारा दुचाकीस्वार (क्रमांक समजू शकला नाही) फरार झाला आहे.
------
झोडगेत घरफोडीचा
अयशस्वी प्रयत्न
मालेगाव : झोडगे (ता. मालेगाव) येथील किशोर देवराम देवरे (वय ४८, रा. गल्ली नं. ३) यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील वस्तू व साहित्य अस्ताव्यस्त फेकत घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. या घरफोडीत कुठलाही ऐवज चोरीस गेला नाही. श्री. देवरे यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुध्द घरफोडीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.