esakal | नाशिकमध्ये दिवाळीत अकरा ठिकाणी आगीच्या घटना; ७ घटना फटाक्यामुळे, ४ अकस्मात
sakal

बोलून बातमी शोधा

fire at home.jpg

दिवाळीमध्ये फटाक्याच्या थिंनगीने आग लागण्याच्या घटना घडत असतात. यंदा मात्र आग लागण्याच्या घटनांमध्ये घट झाली. दिवाळीच्या पाच दिवस अर्थात लक्ष्मीपुजन आणि भाऊबीजच्या दिवशीच फटाके फोडण्याचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे याच दिवसात आग लागण्याच्या घटनाही घडत असतात. अग्निशमन विभागाने तशी तयारीही ठेवली होती. तसे मात्र घडले नाही.

नाशिकमध्ये दिवाळीत अकरा ठिकाणी आगीच्या घटना; ७ घटना फटाक्यामुळे, ४ अकस्मात

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : दिवाळीच्या पाच दिवसांत शहरातील विविध भागात ११ आगीच्या घटना घडल्या. त्यात ७ घटना फटाक्यांमुळे तर उर्वरीत ४ घटना आकस्मात आगीच्या असल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. विशेष म्हणजे कुटल्या प्रकारची जीवीतहानी घडली नाही. आकस्मात जळीतच्या घटनेत मात्र काही प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी सुमारे १६ घटना घडल्या होत्या. 

दिवाळीत अकरा ठिकाणी आगीच्या घटना 

दिवाळीमध्ये फटाक्याच्या थिंनगीने आग लागण्याच्या घटना घडत असतात. यंदा मात्र आग लागण्याच्या घटनांमध्ये घट झाली. दिवाळीच्या पाच दिवस अर्थात लक्ष्मीपुजन आणि भाऊबीजच्या दिवशीच फटाके फोडण्याचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे याच दिवसात आग लागण्याच्या घटनाही घडत असतात. अग्निशमन विभागाने तशी तयारीही ठेवली होती. तसे मात्र घडले नाही. यावर्षी सणावलीवर कोरोनाचे सावट असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते. नागरीकानी त्यास प्रतिसाद दिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फटाके फोडण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आग लागण्याच्या जास्त घटनाही घडल्या नाही.

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

नाशिक - ७ घटना फटाक्यामुळे, ४ अकस्माक 

दिवाळी काळात घडलेल्या आगीच्या ११ घटनांमध्ये फटाक्यापासून आग लागण्याच्या घटना घडल्या परंतु त्या किरकोळ स्वरुपाचे होत्या. कचरा, झाड जळणे, डोंगरावरील गवतास आग याचा त्यात समावेश आहे. तर अन्य चार घटनेत भंगार दुकान, घरातील दिव्यामुळे देवळ्यास आग, किरणा दुकानास आगेचा समावेश आहे. घरातील देवाऱ्यास आग लागण्याच्या घटनेत मोठा अपघात होण्याची शक्यता होती. सुदैवाने अग्निशमन पथक वेळेवर पोहल्याने अनर्थ टळला. तर दुकानांच्या आगीच्या घटनेत काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली. जीवीतहानी कुटल्याही घटनेत घडली नाही. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान
 
शहरातील आगेच्या घटना 
खुटवडनगर दिव्यामुळे घरातील देवाऱ्यास आग 
खत प्रकल्पसमोरील डोंगरावर गवतास फटाक्यामुळे आग 
नाशिकरोड किराणा दुकानास शॉर्टसक्रीटने आग 
सामंतगाव रोडवरील झाडास फटाक्यामुळे आग 
नाशिकरोड येथील शेडवरील कचऱ्यास फटाक्याने आग 
सितागुफारोड वरील इमारतीच्या बाल्कणीतील कचरा आणि भंगार वस्तूना फटाक्याने आग 
मालवीय चौक पतंग दुकानास आग 
गंजमाळ भागातील बुक डेपो मागील कचऱ्यास फटाक्यामुळे आग 
काठेगल्लीतील झाडास फटाक्याने आग 
गडगरी चौक भागात झाडास फटाक्याने आग 
घारेपुरे घाट येथील भंगार दुकानास आग  

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

loading image