Nashik : अकरावीची प्रवेशप्रक्रिया रखडली

Admissions
Admissionsesakal

नाशिक : दहावीचा निकाल (SSC Result) जाहीर होऊन १५ दिवस उलटूनही अकरावीची प्रवेशप्रक्रिया (11th admission) ठप्पच आहे. सीबीएसईसह अन्‍य बोर्डांतील दहावीचा निकाल जाहीर न झाल्‍याने प्रक्रिया रखडल्‍याची चर्चा आहे. लवकरात लवकर प्रक्रिया राबविण्याची मागणी पालक, विद्यार्थ्यांकडून होत आहे. (Eleventh admission process stopped Nashik Education News)

नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिभूत प्रक्रियेद्वारे प्रवेश दिले जाणार आहेत. गेल्‍या ३० मेपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात झाली होती. ऑनलाइन अर्जांतर्गत भाग एक भरण्याची सुविधा उपलब्‍ध करून दिली होती. यात विद्यार्थ्यांची वैयक्‍तिक माहिती, आरक्षणाचा तपशील आदींचा समावेश होता, तर महाविद्यालय व शाखा निवडीसाठी अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली नव्‍हती. निकाल जाहीर झाल्‍यानंतर अर्जाच्या भाग दोनला सुरवात होईल, अशी अपेक्षा व्यक्‍त होत होती. मात्र, १७ जूनला निकाल जाहीर होऊनही अद्यापपर्यंत अकरावी प्रवेशासाठी अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही.

Admissions
Nashik : मतदारांच्या सन्मानार्थ आयुक्त मैदानात

चोवीस हजार नोंदणी

आतापर्यंत अर्जाचा भाग एक भरण्याच्‍या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. २३ हजार ९७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात सुमारे साडेबावीस हजार जागा उपलब्‍ध आहेत. मात्र, उपलब्‍ध जागांच्‍या तुलनेत अधिक नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष अर्जाचा भाग दोनकडे लागून आहे.

Admissions
मद्यपी प्रेमवीराचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com