धुळे : टुडे पान ४ साठी..
--
फोटो क्रमांक : 32898
साक्री : निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात बोलताना न्यायाधीश मुग्धा गांगुर्डे. शेजारी डीवायएसपी ओंकार गवळी, प्रवीण सोनवणे, राजेंद्र अहिरे, भारतीय देवरे आदी.
--
संविधानिक मूल्ये प्रत्यक्ष आचरणात आणावीत
--
न्यायाधीश मुग्धा गांगुर्डे : साक्रीत निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. १८ : समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी, प्रतिष्ठा आणि न्याय मिळणे ही लोकशाहीची मूलभूत अपेक्षा आहे. भारतीय संविधानाने दिलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये केवळ पुस्तकापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणली पाहिजेत, असे प्रतिपादन साक्री न्यायालयाच्या न्यायाधीश मुग्धा गांगुर्डे यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त संत तुकाराम सामाजिक संस्था संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्रातर्फे झालेल्या खुल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अंबापूर (ता. साक्री) येथील सिद्धान्त समाजकार्य महाविद्यालय येथे पार पडला. याप्रसंगी त्या बोलता होत्या. संस्थेचे सचिव प्रवीण सोनवणे अध्यक्षस्थानी होते. साक्री पोलिस ठाण्याचे उपअधीक्षक ओंकार गवळी, आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने सुरुवात झाली. संस्थेच्या अध्यक्षा भारतीय देवरे यांनी न्यायाधीश गांगुर्डे यांना संविधानाची प्रत देऊन स्वागत केले. कामगार व महिला सक्षमीकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान असा या स्पर्धेचा विषय होता. डीवायएसपी गवळी यांनी शांतता व सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले. श्री. सोनवणे यांनी शिक्षणाद्वारे आत्मविश्वास व समाजपरिवर्तन घडत असल्याचे सांगून आंबेडकरी विचारांवर आधारित समाजनिर्मितीचे आवाहन केले.
-
स्पर्धेत सोनाली संतोष शिंदे हिने प्रथम, प्रणाली राजेंद्र गायकवाड हिने द्वितीय तर कावेरी अंबादास बेडसे हिने तृतीय क्रमांक पटकावला. मोहित कैलास बच्छाव, प्रियांशी धनपाल राऊत व प्राची रावसाहेब भदाणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. संस्थेचे संचालक सुनील सोनवणे व साहेबराव सोनवणे, अध्ययन केंद्र सदस्य आर. डी. साळवे, डी. एम. मोहिते, नाना वाघ, राजेंद्र सामुद्रे, जयवंत शिंदे, दिलीप मोरे, राहुल थोरात, कबीराकार डॉ. दिलीप लोखंडे, राजेंद्र वाघ उपस्थित होते. निबंध स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. चंद्रकांत कढरे व प्रा. डॉ. कैलास वाघ यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते सतीश पेंढारकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. भूषण शिमले, प्रा. पल्लवी वाघ, प्रा. वृषाली शेवाळे, प्रा. अर्चना महाले, प्रा. अक्षय बच्छाव, प्रा. जयवंत सूर्यवंशी, प्रा. निलेश गायकवाड, प्रा. सिद्धार्थ सोनवणे, कर्मचारी राकेश वसावे, गणेश पराडके आदींनी संयोजन केले.