सेकंड मेन
---
NSK26H34948
नंदुरबार : रुखमाबाई बालिकाश्रमाच्या मुलींशी संवाद साधताना महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे. शेजारी आयुक्त माधवी सरदेशमुख, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी पंकज पटले आदी.
---
‘मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन पाठीशी’
मंत्री आदिती तटकरे यांचा रुखमाबाई बालिकाश्रमातील मुलींशी संवाद
नंदुरबार, ता. १३ : ‘तुमच्या शिक्षणात किंवा भविष्यात काही अडथळे येत असतील, तर काळजी करू नका. आम्ही सर्वजण तुमच्या मदतीसाठीच आहोत. तुमच्या प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शासन व प्रशासन सदैव तुमच्या पाठीशी उभे आहे’, अशी ग्वाही महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी रुखमाबाई बालिकाश्रमातील मुलींना दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री आदिती तटकरे यांनी सोरापाडा (ता. अक्कलकुवा) येथील रुखमाबाई बालिकाश्रमाच्या मुलींशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी मुलींच्या शिक्षणाची, आरोग्याची, निवासाची, भोजनाची, तसेच बालगृहातील उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. मुलींच्या समस्या जाणून घेत त्यांना विचार मांडण्यास प्रोत्साहित केले. बालगृहातील मुलींनी परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घ्यावे. स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, असे मंत्री तटकरे यांनी सांगितले. बालगृहांमध्ये मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, पोषक आहार, आरोग्य सुविधा आणि सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे, असे निर्देशही त्यांनी दिले.
---
चौकट
NSK26H34947
नंदुरबार ः आचल वसावे या विद्यार्थिनीला जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसविताना मंत्री आदिती तटकरी, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी.
आचल वसावे बनली एक दिवसाची जिल्हाधिकारी
दरम्यान, बालदिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘एक दिवसाची जिल्हाधिकारी’ या उपक्रमांतर्गत सोरापाडा येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची अकरावीची विद्यार्थिनी आचल वसावे हिला जिल्हाधिकारी म्हणून कामकाज समजून घेण्याची संधी मिळाली. तिने जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली. मुलींमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होऊन प्रशासनाची माहिती मिळावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे डॉ. सेठी म्हणाल्या. आचल वसावे हिने सांगितले, की मला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सनदी अधिकारी व्हावयाचे आहे. त्याची तयारी मी करीत आहे. या वेळी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी पंकज पटले, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आनंद जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हरिभाऊ हाके, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया गावित आदी उपस्थित होते.