सखी संजीवनी कार्यशाळा

सखी संजीवनी कार्यशाळा
Published on: 
धुळे : टुडे पान १ साठी.. सेकंड मेन -- फोटो क्रमांक : 33418 लौकी (ता. शिरपूर) : एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलमध्ये ‘सखी संजीवनी अभियान’ कार्यशाळेदरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते. शेजारी बाबासाहेब बेलदार, प्रमोद पाटील, डॉ. रवींद्र सोनवणे, आदी. -- सखी संजीवनी अभियानातून धुळ्यात मुलींचे सक्षमीकरण -- लौकी येथे कार्यशाळा; किशोरवयीन मुलींच्या भावविश्वाला मायेची किनार सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २४ : प्रत्येक मुलीच्या मनात स्वप्नांचे, प्रश्नांचे आणि न बोललेल्या भावनांचे एक वेगळे विश्व असते. वाढत्या वयातील शारीरिक बदल, मनाची घालमेल, अभ्यासाचा ताण आणि भविष्याची चिंता यांसारख्या प्रश्नांवर योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी जिल्ह्यात ‘सखी संजीवनी अभियान’ राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या संकल्पनेतून शिरपूर तालुक्यातील लौकी येथील एकलव्य मॉडेल मॉडेल रेसिडेन्सी स्कूलमध्ये किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी नुकतीच एकदिवसीय विशेष कार्यशाळा पार पडली. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ शिक्षण किंवा शारीरिक आरोग्याकडे लक्ष देऊन चालत नाही, तर त्यांचे मानसिक स्वास्थ्य, आत्मविश्वास आणि सुरक्षितताही महत्त्वाची आहे. याच उद्देशाने या अभियानाची सुरुवात करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी विसपुते यांनी स्पष्ट केले. या कार्यशाळेत विद्यार्थिनी, शिक्षिका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, परिचारिका, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय व फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थी आणि महिला पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, शिरपूरचे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजय फडोळ, शिरपूरचे तहसीलदार महेंद्र माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, शिक्षणाधिकारी वैभव बाचकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता प्रा. डॉ. वनमाला पवार आदी उपस्थित होते. - या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या महिला पुढे ‘जिल्हास्तरीय मुख्य प्रशिक्षक’ (डिस्ट्रिक्ट मास्टर ट्रेनर) म्हणून काम करणार आहेत. त्या जिल्ह्यातील इतर महिला आणि विद्यार्थिनींना प्रशिक्षण देऊन आरोग्य, पोषण आणि सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करतील. एक महिला सक्षम झाली की ती अनेक महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते, या दृष्टिकोनातून महिलांच्या सक्षमीकरणाची व्यापक चळवळ उभी राहत आहे. मुलींना निरोगी शरीर, आनंदी मन आणि सुरक्षित भविष्य मिळवून देण्याच्या दिशेने हे अभियान एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. - विविध विषयांवर मार्गदर्शन कार्यशाळेत तज्ज्ञांनी मुलींशी संवाद साधून विविध विषयांवर मार्गदर्शन केले. योगतज्ज्ञ सिद्धी ढगे यांनी योग सत्र घेतले, तर प्रा. डॉ. जगदीश झिरे यांनी मानसिक आरोग्य व ताणतणाव व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. आहारतज्ज्ञ प्रज्ञा धिवरे यांनी संतुलित आहार आणि योग्य पोषणाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच प्रा. डॉ. वनमाला पवार यांनी ‘निपुण भारत अभियाना’ची, तर नरेश बोरसे यांनी ‘राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमा’ची माहिती दिली. स्त्रीरोगतज्ज्ञ प्रा. डॉ. विशाल पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com