SUG26B03166
खुंटविहीर ः येथे शालेय विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व फराळाचे वाटप करताना आदिवासी विद्यार्थ्यांसह नाशिक येथील गजपती युवा मंच ट्रस्टचे अध्यक्ष व पदाधिकारी.
-------------------
३६-३
कष्टकरी पालकांच्या मुलांसोबत दिवाळी
गजपती युवा मंच ट्रस्टतर्फे आदिवासी भागात शैक्षणिक साहित्य, फराळवाटप
सकाळ वृत्तसेवा
सुरगाणा, ता. १३ ः अतिदुर्गम आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे हे शिक्षकांच्या हाती असते. पुस्तकी शिक्षणाबरोबरच समाजात वावरण्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे असे आवाहन गजपती युवा मंच ट्रस्टचे (नाशिक) अध्यक्ष गणेश बोरसे यांनी खुटंविहीर येथे केले.
आदिवासी भागातील दोनशे पाड्यावरील विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व दिवाळी फराळ वाटपाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पोलिस पाटील यादव झिरवाळ, रतन चौधरी, ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रीतम भामरे, सहाय्यक लेखाधिकारी किरण माळवे ट्रस्टचे सदस्य अथर्व महाले, शशिकांत आहेर, सूरज डंबाळे, यश टिळे, रोहित घायवाटे, राज वैरागे, यश हार्डे, अभिषेक शिंदे, कुणाल त्रिभुवन, ओम पंडुरे, साहिल आगळे, नितीन रायते, चिन्मय माळवे आदी उपस्थित होते.
श्री. बोरसे म्हणाले,‘ आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये हुशारी, जिद्द, चिकाटी, कौशल्य मोठ्या प्रमाणात असते, शिक्षकांनी त्यांना शहरी भागात सहज वावरता, बोलता आले पाहिजे यासाठी प्रशिक्षित करायला हवे. योग्य मार्गदर्शन मिळाले तर ही मुले भविष्य घडवतील अशी आशा व्यक्त केली. उपाध्याध प्रीतम भामरे यांनीही मनोगत व्यक्त केले
मोहपाडा, खुंटविहीर, उलालदरी, उंबरघोडा, उंबरपाडा, झिरणीपाडा, गाळबारी या पाड्यावरील विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व फराळाचे वाटप करण्यात आले. गरजूंना कपड्याचे वाटप करण्यात आले. खुटंविहीर येथे सांस्कृतिक हाॅलमध्ये फॅन बसविणे, तातापाणी उंबरपाडा येथे दोन हजार लिटरची पाण्याची टाकी भेट देणार असल्याचे गणेश बोरसे यांनी जाहीर केले. हस्तकलाकार माजी सैनिक शिवराम चौधरी यांनी तयार केलेले आदिवासी बोहाडा कलाकृती, संस्कृती, सोंगी मुखवटे पाहून त्यांनी कौतुक केले. शिक्षक लक्ष्मण चौधरी, सीताराम राठोड, विठ्ठल वाघमारे, चिंतामण चौधरी, विद्या राऊत, किशोर गावित, खुशाल राऊत, अशोक जाधव, जयराम जाधव, सोनीराम राऊत, कमलेश गायकवाड आदी उपस्थित होते.
-------