आदिवासी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा ध्येयाचा एक प्रेरणादायी प्रवास

आदिवासी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा ध्येयाचा एक प्रेरणादायी प्रवास
Published on: 
पान-२ सदर आहे. तीच्या कर्तृत्वाची गाथा ---------------- फोटो ः सुनंदा घुटे फोटो ः आदिवासी महिलांना प्रशिक्षण देताना सुनंदा घुटे ---------------- आदिवासी महिलांना आर्थिक स्वावलंबी करण्याचा ध्यास -------------------- रखमाजी सुपारे पेठ ः आदिवासी भागातील महिलांना संसाराच्या चौकटीतून बाहेर काढून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे व्रत सुनंदा बाळू घुटे (रा पिंपळपाडा) यांनी स्वीकारले आहे. एम. ए., डी. एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१९ पासून माणदेशी फाऊंडेशन या संस्थेत फिल्ड ऑफिसर म्हणून काम करताना पेठ, सुरगाणा आणि कळवण तालुक्यांतील आदिवासी महिलांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे, हाच त्यांचा मुख्य उद्देश राहिला आहे. सुनंदा घुटे यांनी आजपर्यत विविध व्यावसायिक विषयांवर पाच हजारापेक्षा अधिक महिलांना प्रशिक्षित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने मशरूम शेती (आळंबी उत्पादनाचे प्रशिक्षण) शेळीपालन व कुक्कुटपालन, शेतीविषयक माती परीक्षणाचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे पेठ तालुक्यातील अनेक महिलांनी मशरूम शेती व शेळी पालनाच्या व्यवसायातून आपला आर्थिक विकास साधला. मानवी विकास योजनेअंतर्गत कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारा जोडधंदा त्यांनी म्हणून जंगलातील नैसर्गिक साधनसंपदेतून महिलांना स्वावलंबी करण्यात योगदान दिले आहे. करवंदाचे लोणचे, भोकरीचे लोणचे, बांबूचे लोणचे वास्ते (बांबूचे कोंब) या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला सुनंदा यांनी मुंबई, ओझर, नाशिक अशा विविध शहरांमध्ये आदिवासी महिलांचे स्टॉल लावून उत्पादन विक्री करून हक्काची बाजारपेठ मिळवून दिली. उदरनिर्वाहासाठी पेठ व सुरगाणा भागातील आदिवासी कुटुंबांना दरवर्षी स्थलांतरे करावे लागते. यामुळे लहान मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यासाठी सुनंदा घुटे यांनी स्थानिक पातळीवर महिलांना जोडधंद्यांचे प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे स्थलांतर थांबले असून, मुलांचे शिक्षण सुरळीत सुरू झाले आहे. आदिवासी महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या पाहिजे हे ध्येय ठेवून निखळ, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सुनंदा बाळू घुटे यांची जिद्द, संघर्ष आणि महिला सक्षमीकरण करण्याचा प्रवास सुखकारकच म्हणावा लागेल. ------------ कोट आदिवासी महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या पाहिजे हे ध्येय ठेवून काम करत आहे. रोजगारासाठी त्यांचे होणारे स्थलांतर थांबावे यासाठी गावातच रोजगाराचे पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. - सुनंदा घुटे, पिंपळपाडा, ता. पेठ -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com