शहरात बेकायदा वीज जोडणीमुळे अतिक्रमणाला प्रोत्साहन; मनपा गुन्हा दाखल करणार

Malegaon Municipal Corporation latest marathi news
Malegaon Municipal Corporation latest marathi newsesakal

मालेगाव (जि. नाशिक) : महानगरपालिकेकडून (municipality) बांधकाम परवानगी न घेता शहरात काही प्रमाणात बेकायदा बांधकामे व अतिक्रमण (Encroachment) सुरु आहेत. अशा अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमणधारकांना मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीकडून (एमपीएसएल) सरळ वीज जोडणी देण्यात येत आहे.

वीज सहजासहजी उपलब्ध झाल्याने अतिक्रमणांना प्रोत्साहन मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर ज्या बेकायदेशीर व अतिक्रमित आस्थापनांना खासगी वीज कंपनीने जोडण्या दिल्या आहेत.

त्या आस्थापनांचे सर्वेक्षण करुन एमपीएसएल या वीज ठेकेदार कंपनीविरुद्ध सामुदायिक गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी विद्युत विभागाला दिले आहेत. (Encouraging encroachment due to illegal electricity connection in city Municipality will file case on MPL Company Latest marathi news)

Malegaon Municipal Corporation latest marathi news
Nashik : स्वीमिंग टँकमधून बुडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

शहरात मुळातच अतिक्रमण ही एक डोकेदुखी आहे. महापालिका सभागृहाची मुदत संपल्यानंतर आयुक्त श्री. गोसावी यांनी प्रशासकपदी सुत्रे हाती घेताच शहरातील गटार, रस्ते व नाल्यांवरील अतिक्रमण विरोधात मोहीम सुरु केली.

एकाचवेळी चार प्रभागात मोहीम सुरु झाली. यात अनेक गैरप्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आले. गटारी, नाले, मोकळे भुखंड यावरही अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमणे करुन बांधकामे केली. यामुळे पालिकेचा महसूल बुडाला.

तथापि, अशा जागांची बांधकाम परवानगी, कायदेशीर मान्यता, शासन व्यवसाय परवाना व तत्सम कागदपत्रांची खातरजमा न करताच एमपीएसएल संस्थेने वीज जोडण्या दिल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शहरातील बेकायदा बांधकाम, अतिक्रमणे व विनापरवाना व्यवसाय यांना जणू काही अभय दिल्याचे वाटते. त्याची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Malegaon Municipal Corporation latest marathi news
आदिवासी महिलांची बल्ल्यावरुन पाण्यासाठी पुन्हा रोजची जीवघेणी कसरत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com