NMC News: महापालिकेकडून शालिमार भागात अतिक्रमण मोहीम; गळ्यांचे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढले

encraochment removed by nmc
encraochment removed by nmcesakal

NMC News : महापालिकेकडून गुरुवार (ता.४) शालिमार भागात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. येथील पिरजादे कब्रस्तान जागेवरील अनाधिकृत बांधकाम केलेल्या गळ्यांचे अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (Encroachment drive by nmc in Shalimar area shop encroachment removed with JCB nashik news)

कब्रस्तानच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याची तक्रार २०१९ रोजी महापालिकेत करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकडून पाहणी करत संबंधिताना नोटीस बजावण्यात आली होती. या संदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू होती.

शिवाय कोरोना प्रादुर्भावमुळे अतिक्रमण मोहीम लांबली होती. गेल्या वर्षी काही प्रमाणात तेथील अतिक्रमण हटवण्यात आले होते. महापालिकेकडून पुन्हा त्यांना नोटीस बजावत अतिक्रमण काढण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

त्याविरुद्ध कब्रस्तान विश्वस्त पीरजादे कुटुंबीयांकडून न्यायालयात कारवाईस स्थगिती मिळावी. अशी याचिका करण्यात आली होती. न्यायालयाकडून याचिका रद्द केली. अतिक्रमण काढण्याचा मार्ग मोकळा झाला.

बुधवार (ता.३) दुपारी चार वाजेच्या सुमारास महापालिका अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यवसायिकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. आठ दिवसापूर्वीही त्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

त्यांनी अतिक्रमण काढले नाही. शेवटी गुरुवार (ता.४) सकाळी ६ वाजेच्या सुमारास अतिक्रमण उपायुक्त करुणा डहाळे अतिक्रमण पथक आणि पोलिसांचा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

त्यांच्या मार्गदर्शनात महापालिका सहाय्यक आयुक्त मदन हरिश्चंद्र, पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेर, पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव तसेच महापालिका बांधकाम विभाग आणि नगर रचना विभागाचे अधिकाऱ्यांकडून सकाळी सात वाजेच्या सुमारास अतिक्रमण मोहिमेस सुरुवात करण्यात आली.

सुमारे चार तासात दहा वाजेपर्यंत संपूर्ण ३३ गाळ्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. दरम्यान स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याची विनंती करत व्यवसायिकांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला. पथकाने मात्र विरोधात न जुमानता अतिक्रमण काढले. दुकानातील सर्व माल काढून ठेवले असले तरी दुकानांचे मात्र मोठे नुकसान झाले.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त शालिमार भागात तळ ठोकून होते. गाळ्यांच्या मागील बाजूस तीन रहिवासी घरे असल्याने तेथील अर्धा भाग पथकाने काढला तर उर्वरित भाग घरातील रहिवाशांना काढून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या.

वाहतूक बंद

अतिक्रमण असलेल्या भागास लागून असलेल्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात आली होती. सुमारे चार ते पाच तास येथील वाहतूक बंद करत अन्य मार्गाने वाहतूक वळविण्यात आली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

encraochment removed by nmc
ZP Staff Transfer : ठरलं..16 मे पासून कर्मचाऱ्यांच्या बदल्या; असे आहे बदल्यांचे वेळापत्रक...

जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही. याची काळजी घेण्यात आली. वीज वितरण विभागाकडूनही मोहिमेदरम्यान परिसरातील विद्युत पुरवठा काही वेळ खंडित करण्यात आला होता.

कर्मचारी जखमी

अतिक्रमण मोहीम राबवत असताना महापालिका कर्मचारी भगवान सूर्यवंशी जखमी झाले. त्यांच्या पायास पत्रा लागल्याने मोठी जखम झाली. त्यांना त्वरित उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना बघता अन्य कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही.

माजी मंत्र्यांचा मोहिमेस विरोध

माजी मंत्री यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांना फोन करून अतिक्रमण मोहीम राबविण्यास विरोध करण्यात आला. परंतु न्यायालयाचे आदेश असल्याने अधिकाऱ्यांनी विरोधास न जुमानता कायदेशीर कारवाही करत गुरुवारी सकाळी संपूर्ण अनाधिकृत अतिक्रमण काढण्यात आले.

encraochment removed by nmc
NEET Exam : ‘नीट’ परीक्षेला 12 हजार विद्यार्थी जाणार सामोरे; 20 केंद्रांवर ऑफलाइन परीक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com