पिंपळगाव बसवंत- पिंपळगाव टोल प्लाझाच्या दोन्ही बाजूने खाद्यपदार्थांसह विविध विक्रेत्यांच्या अनधिकृत दुकानाचा वेढा पडला होता. वारंवार तक्रारी येत असल्याने टोल प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले. जेसीबी मशिनच्या सहाय्याने सुमारे २५ दुकाने जमीनदोस्त केली. गजबजलेला हा परिसर अतिक्रमण हटविल्यानंतर सामसूम झाला.