NMC Tax Recovery: शंभर टक्के करवसुलीसाठी डिसेंबर अखेरची डेडलाइन! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

NMC Tax Recovery
NMC Tax Recoveryesakal

NMC Tax Recovery : पुढील वर्षी एप्रिल- मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने त्या अनुषंगाने डिसेंबर महिन्यापासूनच निवडणुकीची तयारी सुरू होणार आहे.

महापालिकेच्या वसुलीवर त्याचा थेट परिणाम होऊ नये म्हणून डिसेंबरअखेरपर्यंत शंभर टक्के करवसुलीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, एकूण वसुलीच्या १०४ कोटी रुपये वसूल झाले आहे.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात शंभर कोटींचे उद्दिष्ट पार झाले होते. या वर्षी तीन महिने अगोदरच वसुलीचे उद्दिष्ट पार करण्यात विविध कर विभागाल यश आले आहे. (End of December deadline for 100 percent tax recovery Decision in background of Lok Sabha elections nashik)

नाशिक महापालिकेला जीएसटीपाठोपाठ मालमत्ता करातून उत्पन्न प्राप्त होते. परंतु या उत्पन्नात मागील वर्षात घरपट्टीतून १८८ कोटींचा महसूल महापालिकेने मिळविला. चालू आर्थिक वर्षाकरिता घरपट्टीसाठी २१० कोटींचे उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आहे.

या उद्दिष्टपूर्तीसाठी कर विभागाने नियमित करदात्यांसाठी सवलत योजना राबविली. या योजनेतून एप्रिल ते जून २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधीत महापालिकेला घरपट्टीतून तब्बल ९० कोटींचा महसूल मिळाला.

कर सवलत योजनेनंतर मोकळ्या भूखंडांवरील कर आकारणीसंदर्भात मोहीम राबविली. मोहिमेंतर्गत जवळपास पाच हजार दुहेरी कराचे प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

घरपट्टीची थकबाकी वसुलीसाठी पहिल्या टप्प्यात अडीच लाखांपेक्षा अधिक घरपट्टी थकीत असलेल्या १४२५ थकबाकीदार मिळकतधारकांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत.

साडेतीन महिन्यांत विविध कर विभागाने १०४ कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. पुढील वर्ष निवडणुकांचे असल्याने या कालावधीमध्ये घरपट्टी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

आर्थिक वर्षाच्या पहिल्या साडेतीन महिन्यांतच घरपट्टीच्या निर्धारित उद्दिष्टापैकी निम्मी वसुली झाली आहे. दुसरीकडे पाणीपट्टी वसुलीची कामगिरी मात्र सुमार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Tax Recovery
Onion Subsidy : कांदा अनुदानासाठी जिल्हा यंत्रणेचा 435 कोटींचा शासनाकडे प्रस्ताव

"मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी करवसुली चांगली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत करवसुलीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे."- श्रीकांत पवार, उपायुक्त, विविध कर विभाग

विभागनिहाय वसुली (रक्कम कोटी रुपयांमध्ये)

विभाग वसुली

सातपूर ११ कोटी ६३ लाख ५१ हजार ८०८

पश्चिम १९ कोटी ४८ लाख ८९ हजार ४८६

पूर्व १७ कोटी ७५ लाख ८६ हजार ६७२

पंचवटी १८ कोटी पाच लाख ६५ हजार ४९५

सिडको २२ कोटी ६० लाख ८५ हजार ४०८

नाशिक रोड १५ कोटी २६ लाख १९ हजार ४०३

------------------------------------------------------

एकूण १०४ कोटी ८० लाख ९८ हजार २७२

NMC Tax Recovery
Nashik News : दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com