
Nashik News : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीची गळफास घेत आत्महत्त्या
नाशिक : आडगाव परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीमध्ये राहणाऱ्या उच्चशिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्त्या केली. कल्याणी राजाराम फाफाळे (२०, मूळ रा. मऱ्हाळभोई, ता. निफाड) असे मयत तरुणीचे नाव आहे. (Engineering student commits suicide by hanging herself Nashik News)
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी ही आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी या शिक्षण संस्थेत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. शिक्षणानिमित्ताने ती मैत्रिणींसमवेत म्हाडा कॉलनीच्या इमारतीमध्ये भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत होती.
गुरुवारी (ता. २) सकाळी तिची मैत्रिण गेल्यानंतर तिने राहत्या खोलीत गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. मैत्रिणी परत आल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
दरम्यान, कल्याणी हिचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्यातील डाटा उडविण्यात आलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्त्येमागील कारण मात्र समजू शकलेले नाही. याप्रकरणी आडगाव पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.