धुळे : टुडे पान २ साठी...
---
देवरे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा
फलटण स्पर्धेत प्रथम क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १७ : फलटण (जि. सातारा) येथील राष्ट्रीय स्तरावरील ‘इनोव्हेशन २०२६’ प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. राज्यातून आलेल्या २६१ प्रकल्पांतून या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘इनोव्हेशन’ प्रकारात पाच हजारांचे प्रथम पारितोषिक पटकावले.
सीमावर्ती भागातील सैनिकांना कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण मिळावे, यासाठी विद्यार्थ्यांनी ‘हेमीस्फेरीकल सेल्फ हिटेड टेन्ट फॉर डिफेन्स ॲप्लीकेशन’ हा प्रकल्प तयार केला. याद्वारे सैनिकांना आल्हाददायक तापमान व पुरेसा ऑक्सिजन मिळतो. सिद्धी किरण पाटील, चंचल राजेंद्र खैरनार, भाग्यश्री माधवराव पाटील व वैभवी मनोहर पाटील या विद्यार्थ्यांनी ही निर्मिती केली. मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. डी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प सादर झाला. कार्यशाळा अधीक्षक प्रा. डॉ. दीपक सोनवणे व प्रा. वाडे फलटण येथे उपस्थित होते. प्राचार्य प्रा. डॉ. हितेंद्र पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. इंद्रभान बोरसे, प्रा. डॉ. पी. एस. पाटील, प्रा. डॉ. विनोद शिंदे, प्रा. डॉ. जितेंद्र व्यास, प्रा. डॉ. अभिजीजित मोरे, प्रा. डॉ. योगेश पाटील उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष कुणाल पाटील, महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष देवरे, उद्योजक विलास देवरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.