नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा प्रवेशासाठी २० नोव्हेंबरला ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड

नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा प्रवेशासाठी २० नोव्हेंबरला ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड
Published on: 
नामांकित इंग्रजी शाळा प्रवेशासाठी २० नोव्हेंबरला ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १७ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नवापूर, शहादा व नंदुरबार या तीन तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये पहिलीत प्रवेश देण्यासाठी शुक्रवारी (ता. २०) ईश्वरचिठ्ठीद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी एन. एम. साबळे यांनी दिली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नवापूर, शहादा व नंदुरबार या तीन तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या मुला-मुर्लीना पहिली वर्गात सन २०२६-२७ या वर्षासाठी शासनाकडून मंजुर झालेल्या प्रवेशित लक्ष्यांकास अधिन राहून शहरातील नामांकित इंग्रजी माध्यामाच्या निवासी शाळेत शासन निर्णयानुसार अटी व शर्तीना अधिन राहून प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानुसार लाभार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात आलेले आहे. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत एकूण १०८ जागांसाठी लक्ष्यांक प्राप्त झाला आहे. त्यापैकी १३ विद्यार्थ्यांची निवड राखीव प्रवर्गातून थेट करण्यात येणार असून, उर्वरित ९५ जागांसाठी ईश्वरचिठ्ठीद्वारे निवडप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पात्र, अपात्र व राखीव प्रवर्गातील अर्जांची छाननी करण्यात आली आहे. ईश्वरचिठ्ठीद्वारे होणारी तालुकानिहाय निवड नंदुरबार तालुक्यातून २९, नवापूर तालुक्यातून ४० आणि शहादा तालुक्यातून ३९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. याशिवाय राखीव प्रवर्गातून नंदुरबारमधील एक, नवापूर येथील चार आणि शहादा येथील आठ, अशा एकूण १३ विद्यार्थ्यांची थेट निवड होणार आहे. प्रत्येक तालुक्यासाठी २० विद्यार्थ्यांची (१० मुले व १० मुली) प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी संबंधित मुदतीत प्रवेश निश्चित न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रवेशाची संधी देण्यात येणार आहे. पालकांनी, तसेच संबंधित शाळांनी प्रवेशासंबंधीची सर्व कार्यवाही ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथून प्रवेश आदेश प्राप्त करून घ्यावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.