Students from Himachal Pradesh performing group singing while participating in the National Youth Festival.
Students from Himachal Pradesh performing group singing while participating in the National Youth Festival.esakal

National Youth Festival : उत्‍साह, ऊर्जा अन्‌ जल्‍लोषपूर्ण सादरीकरण; समूहगायन स्‍पर्धेत तरुणांचा वाढता उत्‍साह

परंपरांना अधोरेखित करताना उत्‍साह, ऊर्जा आणि जल्‍लोषात झालेले सादरीकरण युवा महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.
Published on

National Youth Festival : परंपरांना अधोरेखित करताना उत्‍साह, ऊर्जा आणि जल्‍लोषात झालेले सादरीकरण युवा महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. विविध राज्‍यांतून आलेल्‍या युवा गायकांनी रसिकांची मने जिंकत महोत्सवात आणखीच जोश भरला.

रविवारी (ता. १४) गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्‍या एकल, समूहगीत गायन स्‍पर्धेत रसिकांना मंत्रमुग्‍ध करणारे सादरीकरण झाले. (Enthusiasm of youth in group singing competition in national youth festival nashik news)

काही गाण्यांवर तर उपस्‍थित रसिकांनी ठेकाही धरला. राष्ट्रीय युवा महोत्सवांतर्गत गायन स्‍पर्धेत दुसऱ्या दिवशीही दमदार सादरीकरण झाले. विविध राज्‍यांतून आलेल्‍या संघांनी व गायकांनी आपल्‍या आवाजाची जादू दाखविली. सुरांचा साज चढविताना परंपरांचे महत्त्व विशद करणारी गीते सादर करण्यात आली.

एकूणच गायनातून विविध राज्‍यांचा मिलाप स्‍पर्धेच्‍या ठिकाणी बघायला मिळाला. स्‍पर्धकांची वेशभूषा लक्षवेधी ठरत होती. यासोबत त्‍यांच्‍याकडील वाद्यही उपस्‍थितांचे लक्ष वेधत होते. स्‍पर्धेच्‍या दुसऱ्या दिवशी हिमाचल प्रदेश, जम्‍मू-काश्मीर, चंडीगड, राजस्‍थान, बिहार, अरुणाचल प्रदेश, तमिळनाडू, पंजाब, केरळ, आंध्र प्रदेश या राज्‍यांतून आलेल्‍या गायकांनी सांघिक व एकल गायन स्‍पर्धेत सहभाग घेतला.

विशेष म्‍हणजे इतर स्‍पर्धकांना प्रोत्‍साहन देताना उपस्‍थित युवकांनी टाळ्यांचा कडकडाट करत संघ भावनेचे दर्शन घडविले. स्‍पर्धेत सोमवारी (ता. १५) अंतिम टप्प्‍यातील गायन होणार आहे. यानंतर मूल्यमापनाच्या आधारावर स्‍पर्धेतील क्रमवारी निश्‍चित केली जाणार आहे.

राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होत समूहगायन करताना जम्मू-काश्मीर येथील सहभागी विद्यार्थी.
राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होत समूहगायन करताना जम्मू-काश्मीर येथील सहभागी विद्यार्थी.esakal
Students from Himachal Pradesh performing group singing while participating in the National Youth Festival.
National Youth Festival Nashik : विविध राज्यांतील खेळाडूंनी गजबजले तपोवन; राष्ट्रीय युवा महोत्सवाची तयारी पूर्ण

स्‍पर्धक युवा कलावंत म्‍हणाले...

''डोळ्यात सुकलेले अश्रू अन्‌ मनातील दुःख, वेदना व्‍यक्‍त करणारे भावनिक गाणे या स्‍पर्धेदरम्‍यान सादर केले. इतरही स्‍पर्धकांचे सादरीकरण खूप छान झालेले असल्‍याने स्‍पर्धेत चुरस बघायला मिळत आहे. स्‍पर्धेनिमित्त नाशिकला प्रथमच भेट देण्याची संधी मिळाली असून, येथील स्‍वच्‍छता मनाला भावली. अगदी माझ्या घराप्रमाणे इथले वातावरण जाणवले.''- विशाल सरमाल (जम्‍मू-काश्मीर)

''तुंबा या वाद्याच्‍या सहाय्याने ‘मिर्झा’ या शैलीतील गीत सादर केले. उपस्‍थितांकडून मिळालेल्‍या प्रतिसादामुळे सादरीकरणाचा उत्‍साह वाढला होता. स्‍पर्धेतील सहभाग अविस्‍मरणीय राहिला. आयोजनही अतिशय उत्‍कृष्ट वाटले. आम्‍हा सर्व युवा कलावंतांना उपक्रमात सहभागी होताना आनंद होत आहे.''- तरनप्रीत सिंग, पंजाब

Students from Himachal Pradesh performing group singing while participating in the National Youth Festival.
National Youth Festival : लोकनृत्यातून देशातील विविधतेचे दर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com