SHC26B13521
शिरपूर : कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांसोबत संचालक डॉ. जे. बी. पाटील व सहकारी.
-------
पटेल अभियांत्रिकीत उद्योजकता कार्यशाळा
शिरपूर, ता. २२ : येथील आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात आयआयटी, मुंबईच्या ई- सेलच्या सहकार्याने आयोजित ‘इल्यूमिनेट २०२६’ या दोन दिवसीय उद्योजकता कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्योजकीय दृष्टिकोनाचे विकसन, स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन, डिजिटल कंटेंट निर्मिती आणि वैयक्तिक ब्रँडिंगविषयी जागरूकता अशा विषयांवर आयोजित प्रात्यक्षिक व चर्चासत्रांत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
उद्योजकता तज्ज्ञ दर्पण साळुंखे यांनी उद्योजकतेची मूलतत्त्वे, उद्योजकीय विचारसरणी आणि व्यवसायाच्या विविध संधी यांविषयी मार्गदर्शन केले. दुबई येथील अस्त्र स्टर्टअपचे संस्थापक कृष सिबल यांनी ‘भारतातील स्टार्टअप्स’ या विषयावर मार्गदर्शन करतांना भारतीय स्टार्टअप परिसंस्थेतील संधी, आव्हाने आणि नवउद्योजकांसमोरील संभाव्य व्यावसायिक पर्याय यांची माहिती दिली. नामवंत उद्योजक आणि कंटेंट क्रिएटर अझीझ काचवाला यांनी डिजिटल कंटेंट निर्मिती, प्रभावी प्रेक्षकवर्गाची निर्मिती आणि वैयक्तिक ब्रँडिंग या विषयांवर मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील आणि उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे यांचे मार्गदर्शन लाभले. आयआयसी अध्यक्ष तथा ई- सेलचे सल्लागार डॉ. एन. एम. शिंदे, फॅकल्टी समन्वयक प्रा. के. डी. देवरे, विद्यार्थी हार्दिक विसपुते आणि दक्ष राजपूत यांनी संयोजन केले.