esakal | पर्यावरणपूरक फूलमाळांची गणेशभक्तांना मोहिनी; सजावट साहित्यही बाजारात
sakal

बोलून बातमी शोधा

environment friendly ganeshotsav decoration material market nashik marathi news

गणरायाचे शनिवारी (ता. २२) आगमन होत आहे. या वर्षी कोरोनामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्थापनेपासून माघार घेतलेली असली तरी घरगुती गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे.

पर्यावरणपूरक फूलमाळांची गणेशभक्तांना मोहिनी; सजावट साहित्यही बाजारात

sakal_logo
By
दत्ता जाधव

नाशिक : अवघ्या काही  दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी भक्तांची लगबग सुरू झाली आहे. कोरोनाच्या धास्तीने यंदा सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती मंडळांनीही पर्यावरणपूरक महोत्सवाची हाक दिली आहे. यंदा बाजारात पर्यावरणपूरक कापडी फूलमाळा बाजारात दाखल झाल्या असून, त्याला गणेशभक्तांची पसंतीही मिळत आहे. 

गणरायाचे शनिवारी (ता. २२) आगमन होत आहे. या वर्षी कोरोनामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्थापनेपासून माघार घेतलेली असली तरी घरगुती गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे. थर्माकोलचे विघटन होत नाही. त्यामुळे शासनाने गत वर्षी त्यावर बंदी घातली होती. यंदाही ती कायम असल्याने अनेकांनी पर्यावरणपूरक गणेश स्थापनेला प्राधान्य दिले आहे. बाजारात सजावटीसाठी अनेक पर्यावरणपूरक शोभेच्या वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. यासाठी मेन रोड, शालिमार, रविवार पेठ, दहीपूल आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुकाने लागले आहेत. 

कापडी फुले, माळा बाजारात 

गणेशाला जास्वंदाचे फूल सर्वाधिक प्रिय आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात जास्वंदाला मोठी मागणी असते. ही गरज लक्षात घेत अनेकांनी हुबेहूब जास्वंदाच्या फुलांसारखी कापडी फुले विक्रीसाठी ठेवली आहेत. वेगवेगळ्या रंगात ही फुले उपलब्ध होत असली तरी लाल व केशरी, तसेच पिवळ्या फुलांना अधिक मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. ३० रुपये डझनापासून ४० रुपयांपर्यंत फुले उपलब्ध होत आहेत. मुंबईत ही फुले तयार होतात, असे विक्रेत्यांनी सांगितले. याशिवाय १८ रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत माळाही उपलब्ध असून, त्यालाही चांगली मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. 

गणपती फेट्याला मागणी 

यंदा गणेशोत्सव सजावटीच्या इतर वस्तूंप्रमाणेच वेगवेगळ्या आकारांतील व रंगांतील गणपतीचे कापडी फेटे बाजारात दाखल झाले आहेत. वेगवेगळ्या रंगांतील व आकारांतील हे आकर्षक फेटे पंधरा रुपयांपासून साठ रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याचे कानडे मारुती लेनमधील विक्रेते मयूर दोंदे यांनी सांगितले. यंदा कोणतीही भाववाढ झालेली नाही, असे ते म्हणाले.  

संपादन - रोहित कणसे

loading image
go to top