नगरपालिकेच्या गणेशोत्सव स्पर्धेत फत्तेसिंग व काटे मारुती ठरले विजेते!

नगरपालिकेच्या गणेशोत्सव स्पर्धेत फत्तेसिंग व काटे मारुती ठरले विजेते!
Published on: 
पान-३ मेन---- फोटो २-२ कॉ घेणे काटे मारुती YEO26B27036-- फत्तेसिंग -YEO26B27034 ---------- येवला : पर्यावरण पूरक गणेश उत्सव स्पर्धेतील विजेत्या मंडळांना बक्षीस वितरण करताना माजी खासदार समीर भुजबळ, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी व पदाधिकारी पहिल्या छायाचित्रात श्री काटे मारुती तालीम संघाचे पदाधिकारी, दुसऱ्या छायाचित्रात श्री फत्तेसिंग बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी --------------- श्री काटे मारुती, श्री फत्तेसिंग मंडळ विजेते ----------- गणेशोत्सव स्पर्धा ः समीर भुजबळांच्या हस्ते बक्षीस वितरण, घरगुती स्पर्धेतील विजेत्यांचाही सन्मान ------------ सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ६ : पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि हरित विकासाचा संदेश देण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धेत येथील श्री काटे मारुती तालीम संघ व श्री फत्तेसिंग बहुउद्देशीय संस्था यांनी संयुक्तपणे ५१ हजाराची बक्षीस पटकावले. नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्या संकल्पनेतून आयोजित सार्वजनिक व घरगुती पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते नमो उद्यान येथे उत्साहात झाला. नगरपरिषदेतर्फे यंदा सार्वजनिक तसेच घरगुती पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा झाली. या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, वृक्षारोपण, कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्ती आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत जनजागृती करणे हा स्पर्धेचा उद्देश होता. या उपक्रमाला गणेश मंडळे तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सार्वजनिक पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत श्री फत्तेसिंग बहुउद्देशीय संस्था व श्री काटे मारुती तालीम संघ यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावत २५ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक मिळविले. नवजीवन कॉलनी मित्र मंडळाने द्वितीय क्रमांक मिळवत २१ हजार रुपये, तर शिवशक्ती मित्र मंडळाने तृतीय क्रमांक मिळवत ११ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. विजेत्या मंडळांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. १६-१ घरगुती स्पर्धेतील विजेते घरगुती पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेलाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रभागनिहाय प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांची निवड करून त्यांना बक्षिसे व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शाडू मातीच्या गणेशमूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, कचरा वर्गीकरण, स्वच्छता, वृक्षारोपण तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या उपक्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले. नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, स्वच्छता व आरोग्य सभापती पारुल गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दीपक लोणारी, महिला व बालकल्याण सभापती शितल शिंदे, नगरसेवक प्रवीण बनकर, मुख्याधिकारी तुषार आहेर, नगरसेविका लक्ष्मी साबळे, जयाताई जाधव, परवीन बानो यांच्यासह निसार शेख, अक्षय राजपूत, जावेद लखपती, अमजद शेख, गुड्डू शेठ जावळे, समीर समदडीया, शंकर मांजरे, कुणाल परदेशी, अरबाज शेख, एजाज शेख, वकील शेख, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, समर्थ अलगट, बांधकाम अभियंता गणेश अंदुरे, स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे आदी उपस्थित होते. ---------- चौकट २०-२ राष्ट्रवादी युवक काँग्रेस गणेशोत्सव स्पर्धा - पर्यावरण पूरक गणेशोत्सव ( बोल्ड करणे) मंगल सिमंत - प्रथम - ११००० वैष्णवी डालकरी - द्वितीय - ७००० प्रांजल भावसार - तृतीय - ५००० अश्विनी परदेशी - चतुर्थ - ३००० रुद्राक्ष वाघ - पाचवा - २००० - सेल्फी विथ बाप्पा ( बोल्ड करणे) शुभ्रा नाईकवाडे - प्रथम विजेते,बक्षीस - सायकल श्रेयस राऊतराय - द्वितीय बक्षीस - स्मार्ट वॉच श्वेता पैठणकर - तृतीय बक्षीस - पॉवर बँक ---------------- कोट गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जनजागृतीचा उत्सव व्हावा, यासाठी नगरपरिषदेने हा उपक्रम राबविला. नागरिकांच्या सहभागातून स्वच्छ, सुंदर व हरित येवला घडविण्याच्या प्रयत्नांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेमुळे चालना मिळाली. - तुषार आहेर, मुख्याधिकारी, येवला नगरपालिका ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com