निफाड- महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात भटकंती करणारे गाइड व कर्मचाऱ्यांना १०० ते १५० च्या समूहाने दाखल झालेल्या फ्लेमिंगोंचे दर्शन झाले. लवकर आलेल्या मॉन्सूनबरोबरच फ्लेमिंगोंच्या रुबाबदार आगमनामुळे नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात मनोहारी दृश्य पाहावयास मिळत आहे.