EPFOने वाढीव वेतनावरील पेन्शनसंदर्भात अर्ज करण्याची तारीख वाढविली; जाणून घ्या अंतिम मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

EPFO App Service

EPFOने वाढीव वेतनावरील पेन्शनसंदर्भात अर्ज करण्याची तारीख वाढविली; जाणून घ्या अंतिम मुदत

सातपूर : सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०१४ पूर्वी निवृत्त झालेले आणि निवृत्तीपूर्वी पर्याय वापरलेले कर्मचारी जास्त वेतनावर पेन्शनसाठी पात्र असतील, असे म्हटले होते. २९ डिसेंबर २२ आणि ५ जानेवारी २३ च्या परिपत्रकाद्वारे क्षेत्रीय कार्यालयांना यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाइन सुविधा १ सप्टंबर १४ पूर्वी निवृत्त झालेल्या आणि संयुक्त पर्यायांचा वापर केलेल्या कर्मचाऱ्यांना संयुक्त पर्यायांच्या वैधतेसाठी अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाइन सुविधा ३ मार्चपर्यत देण्यात आली होती.

आता कर्मचारी/नियोक्ता संघटनांच्या मागणीनुसार केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांनी अशा कर्मचाऱ्यांकडून संयुक्त पर्यायांच्या वैधतेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत ३ मे २०२३ पर्यंत वाढवली आहे. ऑनलाइन सुविधा ईपीएफओ वेबसाइटवर उपलब्ध आहे,या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन भविष्य निर्वाह निधी आयुक्त अनिलकुमार प्रीतम यांनी केले आहे.

टॅग्स :NashikEPFO