
सातपूर : राज्य विमा योजनेंतर्गत नाशिक विभागात डिसेंबरअखेर दोन लाख ९१ हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यात २०२४ या वर्षी दोन हजार दोनशे नवीन आस्थापनांची आणि त्यात काम करत असलेल्या बारा हजार सातशे नवीन कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती ईएसआयसीच्या नाशिक क्षेत्रीय कार्यालयाचे सहसंचालक चंद्रशेखर पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.