Nashik: नृत्य कलेसाठी प्रत्येक जिल्ह्यात व्हावे सेंटर! सरकारची विद्यार्थ्यांसाठी नृत्यकला स्पर्धा होण्याची गरज

Dance Student
Dance Studentesakal

Nashik News : नृत्यकलेतील विविध प्रकारांचे धडे घेऊन अनेक विद्यार्थी घडत आहेत. विद्यार्थी घडत असताना त्यांना वैयक्तिक प्रयत्न करून नृत्य क्षेत्रात स्थान मिळवावे लागते.

विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात डान्स आर्ट फॉर्मची सेंटर झाल्यास नृत्यकलेसाठी व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. (Every district should be center for dance art Government needs dance competition for students Nashik)

स्थानिक नृत्य कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक धोरणात अजेंडा होणे आवश्यक आहे. वैयक्तिक स्तरावरील नृत्य कलाकार, समूहनृत्य कलाकारांना प्रोत्साहन देऊन कलेसाठी प्रयत्न व्हावे, तसेच व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.

भारतीय नृत्यकलेची परंपरा टिकून राहण्यासाठी नवीन पिढी नृत्याकडे आकर्षित होण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा नृत्यकला क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

स्थानिक ठिकाणी सरकारचा व्हावा उपक्रम

नाशिक जिल्ह्यात विविध पर्यटन, धार्मिकस्थळे आहेत. पर्यटन, धार्मिक स्थळांवर स्वखर्चाने विविध संस्था उपक्रम राबवितात.

त्र्यबंकेश्वरला महाशिवरात्रीला, सप्तशृंगगडावर नवरात्रीच्या नऊ दिवस राज्य सरकारच्या उपक्रमांतून स्थानिकांना व्यासपीठ मिळाल्यास स्थानिक नृत्य कलाकारांचा स्थानिक ते राष्ट्रीय प्रवास होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dance Student
Success Story : पठ्ठ्यानं करुन दाखवलं! चार वेळच्या अपयशानंतर शेतकरीपुत्र झाला एसआरपीएफमध्ये पोलिस

लावणी प्रकाराला महत्त्वच नाही

महाराष्ट्रात लावणी नृत्य प्रकार सर्वाधिक लोकप्रिय होता. लावणी देश-विदेशातही प्रतिष्ठा मिळाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता लावणीतील विविध प्रकारांना महत्त्वच राहिले नसल्याची खंत नृत्य कलाकारांनी व्यक्त केली.

"नृत्यकलेसाठी राजाश्रय असणे आवश्यक आहे. नृत्यकला क्षेत्रात व्यक्ती नव्हेत, तर समूह म्हणून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी व्यवस्थापन होणे गरजेचे असून, नृत्यकलेसाठी प्रत्येक जिल्ह्यात सेंटर व्हावी. त्या माध्यमातून विविध स्पर्धा होणे आवश्यक आहे. नृत्यकला क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा स्थानिक ते राष्ट्रीय कलाकार होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे."

- विद्याहरी देशपांडे, संचालिका, अभिजात नृत्य, नाट्य संगीत अकादमी

"सर्व शाळांमध्ये शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण देण्यात यावे. विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय नृत्याची ओळख होण्यास मदत होईल. शाळांमध्ये कलाकारांचे शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम असावेत. त्यांना गोडी निर्माण झाल्यास त्यातील सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल. शाळांमध्ये नृत्य विषय समाविष्ट करून नृत्यशिक्षक नियुक्त करावा."

-डॉ. सुमुखी अथणी, संचालिका, कलानंद कथक नृत्य संस्था

Dance Student
Success Tips By Sadguru : यशस्वी जीवनासाठी फॉलो करा सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या टिप्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com