Phule University Exam : परीक्षा चौथ्या सत्राची, प्रश्‍नपत्रिका दिली तिसऱ्या सत्राची; तासाभरानंतर चुकीची दुरुस्‍ती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित बी.ए.-एलएल.बी. अभ्यासक्रमातील पुनर्परीक्षार्थींच्‍या परीक्षेत गुरुवारी (ता. १८) गोंधळ पाहायला मिळाला.
savitribai phule pune university
savitribai phule pune universityesakal

Phule University Exam : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित बी.ए.-एलएल.बी. अभ्यासक्रमातील पुनर्परीक्षार्थींच्‍या परीक्षेत गुरुवारी (ता. १८) गोंधळ पाहायला मिळाला.

अर्थशास्‍त्र विषयाची चौथ्या सत्राची परीक्षा असताना तिसऱ्या सत्रातील विषयाच्‍या प्रश्‍नपत्रिकेचे वाटप विद्यार्थ्यांना केले होते. तब्‍बल एक तासानंतर चुकीची दुरुस्‍ती करण्यात आली. (Examination of 4th session question paper given for 3rd session from savitribai phule pune university nashik news)

तोपर्यंत विद्यार्थ्यांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागले. पुणे विद्यापीठातर्फे सध्या विविध विषयांच्‍या परीक्षा घेतल्‍या जात आहेत. या अंतर्गत विधी अभ्यासक्रमातील पुनर्परीक्षार्थींच्‍या परीक्षांचाही समावेश आहे. नियोजित वेळापत्रकानुसार गुरुवारी दुपारी दोनला विद्यार्थी चौथ्या सत्रातील अर्थशास्‍त्र विषयाची परीक्षा देण्यासाठी केंद्रावर उपस्‍थित झाले होते.

परीक्षा सुरू झाल्‍यावर विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिकांचे वाटप केल्‍यावर विद्यार्थ्यांनी प्रश्‍नांची उत्तरे लिहिण्यास सुरवात केली. काहींना प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नांमध्ये संभ्रम जाणवल्‍याने त्‍यांनी विचारणा केली. एकंदरीत प्रश्‍नपत्रिकेवरून परीक्षा केंद्रांवर गोंधळ निर्माण झाला होता. काहींनी गोंधळाकडे दुर्लक्ष करीत उत्तरपत्रिकेत लिखाण सुरू ठेवले.

savitribai phule pune university
Phule University Result: पत्रकारिता अभ्यासक्रमांच्या निकालात चुकाच चुका; सावित्रीबाई फुले विद्यापीठातील प्रकार

साधारणतः एक तासानंतर विद्यापीठाने महाविद्यालयांना संपर्क साधत घडलेल्‍या प्रकाराची माहिती दिली. चौथ्याऐवजी तिसऱ्या सत्राची प्रश्‍नपत्रिका दिली गेल्‍याने सुधारित प्रश्‍नपत्रिका उपलब्‍ध करून देत असल्‍याचे सांगण्यात आले. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांनी प्रचंड संताप व्‍यक्‍त केला.

काहींनी तर थेट परीक्षा केंद्र सोडत विद्यापीठाच्‍या ढिसाळ नियोजनाचा निषेध नोंदविला. दरम्‍यान, दुपारी दोन ते सायंकाळी पाच अशी परीक्षेची वेळ असताना प्रत्‍यक्षात मात्र सायंकाळी साडेसहापर्यंत परीक्षा देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर ओढवली होती.

महाविद्यालये अनभिज्ञ...

घडलेल्‍या प्रकारामुळे केंद्रांवर संभ्रम निर्माण झालेला होता; परंतु ठोस माहिती कुणाकडेही नव्‍हती. विद्यापीठातर्फे महाविद्यालयांना यासंदर्भात प्रारंभी काहीही माहिती कळविण्यात आली नव्‍हती. त्‍यामुळे घडलेल्‍या प्रकाराबाबत महाविद्यालयेही अनभिज्ञ होती.

savitribai phule pune university
Phule University Result : निकालातील गोंधळ संपेना! अंतर्गत गुण चुकवले, पुणे विद्यापीठातील प्रकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com