Nashik Crime : ‘उत्पादन शुल्क’चा गावठीवर हातोडा! दीड कोटीचा मुद्देमाल जप्त; ३०० जणांना अटक

पुण्यातील गावठी दारूमुळे बळी गेल्याच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) धडक मोहीम सुरू केली आहे.
nashik An illicit country liquor manufacturing den destroyed by a State Excise Department squad.

nashik An illicit country liquor manufacturing den destroyed by a State Excise Department squad.

sakal

Updated on

नाशिक - पुण्यातील गावठी दारूमुळे बळी गेल्याच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) धडक मोहीम सुरू केली आहे. मागील पाच महिन्यांत नाशिक विभागाने हातभट्टी दारूविरोधात (गावठी) तब्बल ३८३ गुन्हे दाखल करीत एक कोटी ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर गेल्या १० दिवसांमध्ये ९५ गुन्हे दाखल करीत ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याने हातभट्टी दारू बनविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com