अरे वा! नांदूरमध्यमेश्वरमध्ये उतरले रोहित | Exotic birds | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Flamingo

अरे वा! नांदूरमध्यमेश्वरमध्ये उतरले रोहित

sakal_logo
By
सागर आहेर

चांदोरी (जि. नाशिक) : परदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात परिसरातील पाणलोट क्षेत्रात स्थलांतर करून रोहित (Flamingo) पक्षी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात 'रोहित (Flamingo), पक्ष्यांचे वास्तव्याचे प्रमुख ठिकाण आहे. विस्तीर्ण जलाशय, खाद्यान्नाची मुबलकता, पाणथळ जागा अशा वास्तव्य उपयोगी गोष्टी असल्याने पक्षांनी आपल्या 'वसाहती' थाटण्यास सुरुवात केली आहे.

पक्ष्यांच्या स्नेहसंमेलनाची तयारी

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य दरवर्षी भरणारे पक्ष्यांच्या स्नेहसंमेलनाची तयारी सुरू आहे. पक्ष्यांची मांदियाळी गोदेच्याकाठावर सध्या पाहायला मिळत आहे. यावर्षी रोहित पक्ष्याहून अधिक देखणा असलेला तपकिरी डोक्याचा करकोचा (ब्राऊन हेडेड गल) पक्षीनिरीक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मध्य आशिया, तसेच ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, केनियातील सरोवरांमध्ये त्यांना लागणाऱ्या अन्नाची कमतरता निर्माण झाल्यानंतर फ्लेमिंगो मोठया संख्येने स्थलांतर करतात. साधारणतः प्रतिवर्षी नोव्हेंबर ते मार्चदरम्यान प्लेमिंगो निरनिराळ्या ठिकाणी वास्तव्य करतात.

स्थलांतरित पक्षी नांदूरमध्यमेश्वरमध्ये मुक्कामी आल्याने पक्षीप्रेमी व पर्यटकांना फ्लेमिंगो पक्ष्यांसह विविध पक्ष्यांना पाहण्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

स्थलांतरित पक्षी नांदूरमध्यमेश्वरमध्ये मुक्कामी आल्याने पक्षीप्रेमी व पर्यटकांना फ्लेमिंगो पक्ष्यांसह विविध पक्ष्यांना पाहण्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये जायकवाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र तसेच सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील मायणी अभयारण्य, उजनी धरणाच्या जलाशय येथे ते दिसून येतात. बँक वॉटरला क्रौंच, रोहित, बदके, पानकोंबडी, राखी बगळा वेडर्ससह शेकडो विविध प्रकारच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. अनेक स्थलांतरित पक्षी येथे मुक्कामी असल्याचे दिसून येते. पक्षीप्रेमी व पर्यटकांना नांदूरमध्यमेश्वरमध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांसह विविध पक्ष्यांना पाहण्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

loading image
go to top