Nashik- Kalyan MEMU 4 वर्षांपासून प्रलंबित; हिरवा कंदील कधी?

MEMU Local Train
MEMU Local Trainesakal

नाशिक : मुंबईला कनेक्ट करणारी नाशिक- कल्याण मेमू म्हणजेच (मेन लाईन इलेक्ट्रिकल मल्टीपर्पज युनिट) लोकल सुरू होण्याची वाट गेल्या चार वर्षापासून नाशिककर पाहत आहे. कोरोना काळात ही घोषणा हवेत विरली होती. पालकमंत्री या नात्याने दादा भुसे यांनी राज्य शासनामार्फत केंद्राकडे पाठपुरावा करण्याची मागणी नाशिककरांकडून केली जात आहे. (expectation from Guardian Minister dada bhuse Nashik Kalyan MEMU pending for 4 years Nashik Latest Marathi News)

चार वर्षापासून नाशिक कल्याण लोकल चा विषय प्रलंबित आहे. रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे नाशिक वर हा अन्याय सहन करायची वेळ आली आहे. नाशिक कल्याण मेमू लोकलचे गाजर चार वर्षापासून दाखवण्यात येत आहे. मात्र कोरोना काळात ही घोषणा हवेतच विरली. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी यासाठी प्रयत्नही केले होते, या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांशी अनेक मीटिंग झाल्या. कल्याण येथे राहणारे निवृत्त रेल्वे इंजिन तज्ज्ञ वामन सांगळे यांनी यासाठी प्रयत्नही केले. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आजपर्यंत त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही.

नाशिक- कल्याण लोकलसेवेला लाल कंदील महाराष्ट्र दाखविण्यात आला होता. नवीन वंदे मातरम् मेमू लोकलचा घाट घातला गेला. लोकल ही संकल्पना रद्द करून मेमू चालविणार असल्याची अंतिम घोषणा रेल्वेने केली होती. खासदार हेमंत गोडसे यांनी लोकसभेत मागणी केल्यामुळे नाशिक -कल्याण लोकल मंजूर झाली. ३२ कोटी रुपये खर्चून तयार केलेली ही लोकल कुर्ला कारशेडला येऊनही ठेवली.

अंतर्गत तांत्रिक रचना अद्ययावत करून ही लोकल धावण्यायोग्य तयारही करण्यात आली. लोकलच्या टेस्टिंगसाठी नऊ लाख रुपये मंजूरही झाले होते. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांच्या नाकार्तेपणामुळे सध्या या लोकांचा विषय हा रेंगाळत चाललेला आहे. म्हणूनच नव्या पालकमंत्र्यांकडून ही लोकल सुरू होण्याची आशा नागरिकांना असून केंद्रात भाजपचे सरकार असून राज्यातही भाजप समर्थनाचे शिंदे सरकार आहे.

MEMU Local Train
Train Alarm Chain Pulling: धावत्या रेल्वेत साखळी ओढणाऱ्यांकडून 15 लाखाचा दंड

त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून नाशिक- कल्याण मेमू सुरू होईल अशी आशा सध्या नाशिककर व्यक्त करीत आहेत. ही लोकल सुरू झाल्यावर शेतकरी नोकरदार व्यावसायिक विद्यार्थी महिला यांना नाशिक -मुंबई प्रवास करायला सोयीचे होणार आहे. नाशिककरांना शिक्षण, उद्योग, आरोग्य, रोजगार या क्षेत्रांना ऊर्जेचा अवस्था मिळणार आहे.

"ही लोकल सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना मुंबईला शिकण्यासाठी पर्याय राहणार आहे शिवाय उद्योग क्षेत्रामध्ये कनेक्टिव्हिटी वाढवून लघू उद्योगांना चालना मिळू शकते. नाशिक- मुंबई कनेक्टिव्हिटी वाढून नाशिकच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागणार असल्यामुळे नव्या पालकमंत्र्यांनी या लोकलला सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे."

- राजेंद्र पगारे, नागरिक

"उद्योगांची कनेक्टिव्हिटी मेमू लोकल मुळे वाढू शकते. आरोग्याच्या दृष्टीने नव्या संधी नाशिकला चालून येऊ शकतात शिवाय विद्यार्थी महिलांना हव्या त्या स्टेशनवर उतरता येऊ शकते इतर गाड्या प्रत्येक स्टेशनवर थांबत नाही म्हणून ही गाडी म्हणजे नाशिककरांची रोजगार व उद्योगाची लाइफलाइन ठरू शकते." - किसन गुळवे, नागरिक.

MEMU Local Train
Diwali 2022 : सप्तरंगातून उजळले रांगोळीचे सौंदर्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com