चटकदार लोणच्याला यंदा महागाईचा तडका!

mango pickel
mango pickelesakal
Summary

लोणचे तयार करण्यासाठी लागणाऱ्या मसाल्याचे पदार्थ व खाद्यतेलांचे भाव गगनाला भिडले असून वर्षभर जेवणातील अविभाज्य घटक असलेले चटकदार लोणच तयार करणे कठीण व खर्चिक झाले असून गृहिणींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कंधाणे (जि. नाशिक) : चालू वर्षी सततच्या ढगाळ हवामान अवकाळी पाऊस व वादळाने कैऱ्यांची मोठी पडझड झाल्यामुळें कैरी भाव खात आहे. तसेच लोणचे तयार करण्यासाठी लागणाऱ्या मसाल्याचे पदार्थ व खाद्यतेलांचे भाव गगनाला भिडले असून वर्षभर जेवणातील अविभाज्य घटक असलेले चटकदार लोणच तयार करणे कठीण व खर्चिक झाले असून गृहिणींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

(Expensive to make mango pickles due to inflation)

तौक्ते वादळाचा आंब्यांना चांगलाच फटका

ग्रामीण भागात साधारणपणे पावसाळ्यापूर्वी गृहीणी पापड, कुरडया, मसाले, शेवया व इतर विविध प्रकारचे वाळवणाचे पदार्थ तयार करतात. तर मे-जून महिन्यात माॅन्सूनपुर्व वळीव पावसाच्या सरी कोसळल्यानंतर घरोघरी लोणचे तयार करतात. गेल्या वर्षी मुबलक पाऊस झाल्याने आंब्यांना भरपूर प्रमाणात मोहर फुटला होता, परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे तसेच अवकाळी पाऊस आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गारपीट झाल्यामुळे व कैरी ऐन पक्वतेच्या काळात असतानाच तौक्ते वादळाने आंब्यांना चांगलाच फटका बसला असून मोठ्या प्रमाणात कैऱ्या गळून पडल्याने नुकसान झाल्यामुळे कैरींचा तुटवडा निर्माण झाला आहे.

चटकदार लोणचे तोंडी लावणं झाले खर्चिक

तसेच वर्षभर टिकून राहण्याऱ्या लोणच्यासाठी दळदार आणि बाहेरुन काळपट हिरवी परंतु आतून पांढरीशुभ्र गावरान कैरीला गृहीणी अधिक पसंती देतात. परंतु वादळं, जोरदार वाऱ्यासह पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तीत जुन्या काळातील गावरान आंब्यांच्या झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने लोणच्यासाठी पसंतीची कैरी मिळणे कठीण झाले असून कलमी आंब्यांच्या कैरीचे लोणचे बर्षभर टिकून राहण्याची खात्री नसल्याने गावरान आंब्यांची झाडे दुर्मिळ होत आहे. पसंतीची कैरी भाव खात असून सध्या ६०० पासून १००० रुपये शेकडा दराने कैरी विकली जात आहे. तसेच खाद्यतेल, मिरची व इतर मसाल्याच्या पदार्थांच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले असून महागाई वाढल्याने नाराजीचा सूर पसरला आहे.

mango pickel
Nashik Magnet Man : राजेश टोपेंनी दिले चौकशीचे आदेश

१०० कैरीच्या लोणच्याचा मसाल्यासाठी येणारा खर्च
खाद्यतेल : १२००
मिरची पावडर :४०० रुपये
मोहरी डाळ : ५६० रुपये
काळी मिरी :१२०
लवंग : ६०
दालचिनी :६९
वेलदोडे :१५०
हळद : ५०
बडीशेप :५०
मीठ:३०
हिंग पावडर :१२०
इतर : २५९
सरासरी एकूण खर्च २५००/रुपये कैरीचा खर्च वगळून

''मसाला पदार्थ, खाद्यतेलांच्या महागाई व टंचाईमुळे नातेवाईकांकडून मिळणारा कैरीचा वानोळा बंद झाल्याने, बहूतांश महिलांकडून दरवर्षी कुटुंबाला तसेच लग्न झालेल्या व नोकरी करणाऱ्या मुलींच्या परिवारासाठी जेवढ्या कैरीचे लोणचे तयार करण्यात येते त्याचे प्रमाण निम्म्यावर केले जात आहे.

-भारती बिरारी, गृहीणी

(Expensive to make mango pickles due to inflation)

mango pickel
लर्निंग लायसन्‍स मिळेल घरबसल्‍या; पुढील आठवड्यापासून सुविधा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com