नाशिक : खाण्याची मुदतबाह्य पाकिटे महामार्गावर फेकून दिली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Expired Food packet

नाशिक : खाण्याची मुदतबाह्य पाकिटे महामार्गावर फेकून दिली!

इगतपुरी - मुंबई-आग्रा महामार्गावरील माणिकखांब गावाजवळ अज्ञात वाहनातून शेकडो मुदतबाह्य खाद्य पाकिटे फेकण्यात आली आहेत. या भागातील नागरिकांनी ही पाकिटे मोठ्या संख्येने घरी नेली आहेत. या पाकिटांवरील संपलेली मुदत न पाहता त्यात पदार्थ खाल्ला गेल्यास विषबाधा होण्याची शक्यता आहे. अन्न औषध प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित पाकिटांची तपासणी करावी व फेकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

विविध दुकाने आणि टपऱ्यांमध्ये ५ आणि १० रुपयांना वेफर्स आणि कुरकुरेसारखे खाद्यपाकिटे विकले जातात. अशा प्रकारचे विविध खाद्य असणारी पाकिटे वाहनाने माणिकखांब गावाजवळ महामार्गावर उघड्यावर फेकून देण्यात आली. रात्री नऊच्या दरम्यान हा प्रकार झाल्याचे काही नागरिकांच्या ध्यानात आले. पाकिटे पाहिली असता त्यांची मुदत संपलेली आहे. यातील अनेक पाकिटे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी उचलून नेली आहे. हे खाऊन जर विषबाधा झाली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही पाकिटे फेकणाऱ्या व्यक्तीचा तपास करून अन्न व औषध प्रशासनाने गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Expired Food Packets Thrown On Highway

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top