Nashik Grapes Export : नाशिकच्या द्राक्षांची नेदरलॅंड, रोमोनियात निर्यात; 980 टन द्राक्ष रवाना

नाशिक जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षाच्या निर्यातीला सुरवात झाली असून, नेदरलँड आणि रोमोनिया देशांमध्ये ७१ कंटेनरमधून ९८० टन द्राक्ष निर्यातीचा ‘श्रीगणेशा’ झाला आहे.
Export of Nashik grapes to Netherlands and   Romania nashik news
Export of Nashik grapes to Netherlands and Romania nashik newsesakal

Nashik Grapes Export : नाशिक जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षाच्या निर्यातीला सुरवात झाली असून, नेदरलँड आणि रोमोनिया देशांमध्ये ७१ कंटेनरमधून ९८० टन द्राक्ष निर्यातीचा ‘श्रीगणेशा’ झाला आहे.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने जगाला भुरळ घालणाऱ्या नाशिकच्या द्राक्ष हंगामाला सुरवात झाली असून, निर्यातीचे कंटेनर रवाना झाले आहेत. (Export of Nashik grapes to Netherlands and Romania nashik news)

देशाला मोठे परकीय चलन मिळवून देणारे द्राक्ष फळ आहे. २०२२-२३ हंगामात तब्बल दोन लाख ६७ हजार ९५० टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून २५४३ कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले. यंदा द्राक्ष पिकाला पोषक वातावरण होते. त्यामुळे ३८ हजार ४३२ द्राक्ष बागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली. भारतीय शेतमाल आणि फळांना बांगलादेशात मोठी मागणी आहे.

केंद्र सरकारने बांगलादेशात द्राक्ष निर्यातीसाठी विशेष लक्ष देऊन वाहतूक खर्च आणि ड्यूटी कमी केली, तर द्राक्ष निर्यातीस वाव मिळेल, तसेच केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीसाठी नवीन बाजारपेठ (देश) शोधून आपल्याकडील शेतमाल जास्तीत जास्त कसा निर्यात होईल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. गुणवत्ता वाढली, तरी देशांतर्गत बाजार, तसेच निर्यातीच्या बाजारातील असुरक्षितता कायम आहे.

पर्यावरणीय बदलामुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस आतबट्ट्याचा ठरत आहे. सिंचनाची सुविधा असली, तरी रोज बदलत्या हवामानाला समर्थपणे तोंड देऊ शकेल, अशी कोणतीही शाश्वत व्यवस्था नाही. यामुळे शेती करणे जिकिरीचे झाले आहे, पण उत्पादित मालाला बाजारात हवा तसा दर मिळेल, याचीही खात्री नाही.

Export of Nashik grapes to Netherlands and   Romania nashik news
Nashik Grapes Farming : व्यापाऱ्यांकडून लॉबिंगद्वारे द्राक्ष उत्पादकांचा घात; वातावरण बदलाचे फुसके कारण

कारण बऱ्याचवेळा मालाचे उत्पादन एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी जादा झाल्याने भाव पडतात, तसेच शासनाचे आयात निर्यात धोरणही कारणीभूत आहे. अशा अनेक अडचणींवर मात करत जिद्दी शेतकऱ्यांनी द्राक्षांची निर्यात केली आहे.

या देशात होते निर्यात

नेदरलँड, युनायटेड किंग्ड्‌म, जर्मनी, लटवीया, डेन्मार्क, स्वीडन, पोर्तुगाल, स्विझर्लंड, पोलंड, बेल्जियम, फिनलेंड, इटली, स्पेन आदी देशांत द्राक्ष पाठविण्यात येतात.

''द्राक्ष निर्यात वाढल्याने द्राक्षाचे भाव टिकून राहतात. त्यामुळे लोकल मार्केटवर प्रेशर कमी होते. निर्यात वाढविण्यासाठी नवीन मार्केट (देश) शोधण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकार व अपेडा यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना नवीन मार्केट उपलब्ध करून दिल्यास त्याचा आर्थिक फायदा होऊ शकतो.''-कैलास भोसले, उपाध्यक्ष, राज्य द्राक्ष बागातदार संघ

''अस्मानी, सुलतानी संकटातून कशाबशी द्राक्षबाग वाचविली आहे. कांदा व टोमॅटोने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. द्राक्ष निर्यात झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे मिळून आर्थिक सुबकता येईल.''-गोविंद कुशारे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, सावरगाव

Export of Nashik grapes to Netherlands and   Romania nashik news
Nashik Grapes Export : द्राक्षपंढरीतून 20 हजार टनाने अधिकची निर्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com