Nashik : 9 प्रभागांमधून सर्वसाधारण पुरुषमंडळी हद्दपार

NMC Election Latest Marathi News
NMC Election Latest Marathi Newsesakal

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीसाठी (NMC election) इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण महिला गटांसाठी आरक्षण काढण्यात आल्यानंतर नऊ प्रभाग असे आहेत की, तेथे सर्वसाधारण पुरुष उमेदवार हद्दपार झाले आहे.

त्या प्रभागांमध्ये एक तर अनुसूचित जाती किंवा जमातीचे पुरुष उमेदवार किंवा तीनही जागांवर महिला उमेदवार निवडणूक लढविणार आहे. (Expulsion of general men from 9 wards nmc election Latest Marathi news)

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यानुसार २९ जुलैला नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण काढण्यात आले. यापूर्वी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी अनुक्रमे १९ व १० अशा एकूण २९ जागांवर आरक्षण काढण्यात आले.

त्या जागा वगळता उर्वरित १०४ जागांवर आरक्षण काढण्यात आले. इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसी वर्गात ३५ आरक्षण काढण्यात आल्यानंतर ६९ जागांपैकी ३४ जागांवर महिलांसाठी आरक्षण करण्यात आले.

NMC Election Latest Marathi News
राज्यात खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार : CM शिंदे

उर्वरित जागांवर स्त्री किंवा पुरुष दोन्ही उभे राहू शकतात. मात्र, ४४ प्रभागांपैकी नऊ प्रभाग असे आहेत की या प्रभागांमध्ये सर्वसाधारण गटातील पुरुषांना निवडणूक लढविता येणार नाही.

प्रभाग ७, १४, १५, २०, २३, २७, ३५, ३९ व ४४ या नऊ प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तर काही प्रभागांमध्ये अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. या प्रभागांमध्ये सर्वसाधारण पुरुषांना निवडणूक लढविता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

NMC Election Latest Marathi News
Dhule Crime : शेतकऱ्याची दुचाकी लांबविली

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com