NMC Water Tap Connection : पाणी तोटा व गळती रोखण्यासाठी महापालिकेकडून अनधिकृत नळजोडणी नियमितीकरणाचा राबविलेला प्रयोग फसल्यानंतर उपक्रमाला ४५ दिवसांची मुदतवाढीच्या अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. (Extension of regularization of unauthorized NMC Water Tap Connection nashik news)
शहरात जवळपास दोन लाख नळजोडणी धारक असून, धरणातून घरापर्यंत पोचणाऱ्या पाण्यापैकी चाळीस टक्के पाण्याचा हिशोब लागत नाही. त्यामुळे हिशोब बाह्य पाणी शोधण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मोहीम हाती घेतली.
त्यात जवळपास २५ हजारांहून अधिक नळजोडण्या अनधिकृत असतील, असा अंदाज आहे. त्यामुळे अनधिकृत नळजोडणीधारकांसाठी १ मेपासून अभय योजना अमलात आणली. १५ जूनपर्यंत मोहीम होती.
योजनेच्या ४५ दिवसात अवघे ३०७ अनधिकृत नळजोडणी धारकांनीच योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले. त्यामुळे पुन्हा ४५ दिवसांसाठी योजना अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अभय योजनेची मुदत ३० जुलैपर्यंत अंतिम करण्यात आली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यानंतर १ ऑगस्टपासून अनधिकृत नळजोडणी मोहीम राबविली जाणार आहे. यात अनधिकृत नळजोडणी आढळल्यास तिप्पट दंडात्मक रक्कम आकारली जाणार आहे. शुल्क अदा न केल्यास घरपट्टीत दंडात्मक शुल्क आकारले जाणार आहे.
४५ दिवसात दंडाची रक्कम अदा न केल्यास नळजोडणी कायमस्वरूपी बंद करून गुन्हा दाखल करण्याबरोबरच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याच्या नावाखाली प्लंबरवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.