Shivputra Sambhaji Mahanatya : शिवपुत्र संभाजी महानाट्यासाठी जादा बस; जाणून घ्या वेळापत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivputra sambhaji mahanatya

Shivputra Sambhaji Mahanatya : शिवपुत्र संभाजी महानाट्यासाठी जादा बस; जाणून घ्या वेळापत्रक

नाशिक : छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित शिवपुत्र संभाजी महानाट्याला शनिवार (ता. २१) पासून सुरवात झाली. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून नाट्यासाठी जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. (Extra bus by citilink for Shivputra Sambhaji Mahanatya in nashik city Know the schedule)

२१ ते २६ जानेवारी दरम्यान एकूण २४ बस फेऱ्‍या शहरातील विविध भागातून तपोवनपर्यंत देण्यात आल्या आहेत, तर नाटक संपल्यानंतर परतीसाठी १२ बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

असे आहे बस फेऱ्यांचे नियोजन :

बारदान फाटा ते तपोवन १६. ०५, १६. ४५, १७. ०५, १७. ४५ वाजता., सिम्बोसिस ते तपोवन – १६.२५, १६.४५, १७.००, १७.२०, पाथर्डी गाव ते तपोवन १६.१५, १६.४५, १६.५०, १७.२०, अंबड ते तपोवन १६.२०, १६.५०, १७.१०, १७.४०, अमृतानगर ते तपोवन १६.१५, १६.३०, १७. ००, १७.४५, नाशिक रोड ते तपोवन १६. ३०, १६ .५०, १७. १५, १७. ३५ वाजता.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: नारोशंकराची घंटा : रक्त म्हणजे पाणी वाटते का!

परतीच्या प्रवासासाठी तपोवन ते बारदान फाटा रात्री दहा वाजता दोन बस, तपोवन ते सिम्बोसिस दोन बस, तपोवन ते पाथर्डी गाव दोन बस, तपोवन ते अमृतानगर, तपोवन ते अंबडगाव, तपोवन ते नाशिक रोड प्रत्येकी दोन बसचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा: Education News : RTEसाठी शाळांची नोंदणी सुरू होणार; प्रवेशाच्या वेळापत्रकाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष