Citylinc Mahashivratri Bus : त्र्यंबकेश्वरसाठी सिटीलिंकच्या जादा बस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Citylinc news

Citylinc Mahashivratri Bus : त्र्यंबकेश्वरसाठी सिटीलिंकच्या जादा बस

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गरज लक्षात घेऊन महाशिवरात्रीनिमित्त शनिवारी (ता. १८) महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेतर्फे विशेष जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. (Extra buses of Citylinc to Trimbakeshwar on mahashivratri festival nashik news)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

सद्यःस्थितीत सिटीलिंककडून तपोवन आगारातून १५ बसच्या माध्यमातून १०६ बस फेऱ्‍या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात, तर नाशिक रोड आगारातून १० बसच्या माध्यमातून ६० बस फेऱ्‍या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात.

या नियमित बस फेऱ्‍यांव्यतिरिक्त महाशिवरात्रीनिमित्त तपोवन आगारातून ६ बसच्या माध्यमातून ४८, तर नाशिक रोड आगारातून ४ बसच्या माध्यमातून ३२ अशा एकूण १० जादा बसच्या माध्यमातून ८० जादा बस फेऱ्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे.

जादा ८० बस फेऱ्‍या व नियमित १६६ बस फेऱ्या अशा एकूण २४६ बस फेऱ्‍यांचे नियोजन महाशिवरात्रीनिमित्त करण्यात आले आहे.