Eye Donation
sakal
नाशिक: मृत्यूनंतर मृत व्यक्तीची आठवण म्हणून घरात दिवा लावला जातो. पण, ज्या डोळ्यांनी जग पाहता येते त्याच डोळ्यांचा मृत्युपश्चात इतर दृष्टिहिनांना उपयोग झाला तर, त्यांच्याही आयुष्याचे सोने होते. दक्षिण गुजरातच्या डांग या आदिवासी जिल्ह्यातील आहवा गावातील आई, वडील, बहिण असलेल्या हसत्या खेळत्या कुटुंबाने एकुलता तरुण एक मुलगा कायमचा गमावला. मात्र, कुटुंबाने नेत्रदानाचा निर्णय घेत समाजासमोर आदर्श उभा केला.