Devendra Fadanvis News: एकलहरे विद्युत केंद्रातील जुने संच बंद न करता पुनर्विकसित!

Devendra Fadanvis News: एकलहरे विद्युत केंद्रातील जुने संच बंद न करता पुनर्विकसित! भुजबळांच्या प्रश्‍नावर फडणवीसांची माहिती
Chhagan Bhujbal devendra fadnavis
Chhagan Bhujbal devendra fadnavisesakal

Nashik News : सरकारच्या नवीन वीज धोरणानुसार अतिरिक्त दराने वीज खरेदी करू शकत नाही. त्यामुळे नव्याने कुठलाही प्रकल्प विकसित केला जाणारा नाही. मात्र एकलहरे येथील जुने संच पुनर्विकसीत करण्यात येऊन प्रकल्प सुरु ठेवण्यात येईल.

इथल्या कामगारांवर अन्याय होणार नाही, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या लक्षवेधीतील प्रश्‍नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

(Fadnavis information on Bhujbal issue at legislative assembly Redeveloped without shutting down the old sets in Eklahare Power Station nashik news)

एकलहरे येथे ६६० मेगावॅट प्रकल्प मंजूर आहे. मात्र हा प्रकल्प रखडल्याने आमदार सरोज आहिरे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. त्यामध्ये श्री. भुजबळ यांनी सहभाग घेतला.

श्री. भुजबळ म्हणाले की, एकलहरे येथे २१० मेगावॅटच्या तीन संच कार्यान्वित आहेत. त्यांचे आयुर्मान संपत आले आहे. त्यामुळे २०११ मध्ये ६६० मेगावॅट प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.

हे नवीन नाही, जे जुने आहेत त्या ठिकाणी नवीन संच बसावयाचे आहेत. जसे संच जुने होत जातील तशी त्याची कार्यक्षमता कमी होत जाणार आहे हे खरे आहे. त्यामुळे विजेचा दर वाढीव होणार आहे. मात्र मागील काळात हा प्रकल्प नाशिकऐवजी डहाणू येथे प्रस्तावित करण्यात येत आहे का?(Latest Marathi News)

वनविभागाच्या जमिनीची परस्पर विक्री

नाशिक जिल्ह्यातील वनक्षेत्राची भूमाफियांकडून परस्पर विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे भूमाफियांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री. भुजबळ यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे श्री. फडणवीस यांच्याकडे केली. श्री. भुजबळ म्हणाले, की जिल्ह्यात वनजमिनींवर भुमाफियांची वक्रदृष्टी पडली आहे.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

Chhagan Bhujbal devendra fadnavis
Nashik News | मुंबई IITतर्फे 300 कर्मचाऱ्यांना स्तनपान, कुपोषण प्रशिक्षण : ZP CEO आशिमा मित्तल

भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून वनजमिनी गिळंकृत करण्याचे धोरण अवलंबले आहे. नांदगाव, बागलाण, नाशिक तालुक्यात राखीव वनक्षेत्रातील जमिनींची परस्पर विक्री करण्यात आली. डॉक्टरवाडी (ता. नांदगाव) शिवारात वनविभागाचे १ हजार ७८४ एकराचे क्षेत्र असून त्यातील १ हजार १४७ एकर व ३३ गुंठयांचे निर्विकरण झाले आहे.

ते वजा करता उर्वरित क्षेत्रात ७६२ एकर क्षेत्र राखीव वनासाठी ठेवण्यात आले. या वनजमिनीची नोंद बदलून त्या क्षेत्राला वनेत्तर दाखविण्यात आले. ३०० एकर वनजमिनीची खरेदी विक्रीचा व्यवहार झाला आहे.(Marathi Tajya Batmya)

राखीव वनक्षेत्राच्या सात-बारावर थेट खासगी कंपनीचे नाव लागल्याने वनविभागासह महसूल यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच बैसाने (ता. बागलाण) येथील ५५ एकर जमिनीची परस्पर विक्री झाल्याचा प्रकार झाला.

नाशिक शहरालगतच्या गंगापूर, म्हसरूळ, चेहडी बुद्रूक गावातील वनजमिनींच्या सात-बारावरील राखीव वने नोंद गहाळ झाल्याचा प्रकार घडला. त्यापाठोपाठ शिंदे आणि संसारी गाव परिसरात घटना घडली.

Chhagan Bhujbal devendra fadnavis
Market Committee Election : जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी 28 एप्रिलला मतदान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com