येवल्यात ५०० रुपयांच्या बनावट नोटा वटवणारे जेरबंद भाजीपाला खरेदी करून दिल्या नोटा,दोघांना अटक,एक जण फरार

येवल्यात ५०० रुपयांच्या बनावट नोटा वटवणारे जेरबंद भाजीपाला खरेदी करून दिल्या नोटा,दोघांना अटक,एक जण फरार
Published on: 
येवला : पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट पाचशेच्या नोटा. --------------- येवल्यात पाचशेच्या बनावट नोटा वटवणारे जेरबंद भाजीपाला खरेदी करून दिल्या नोटा, दोघांना अटक, एक जण फरार --------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १७ : येथील भाजी बाजारात पाचशेच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांना शनिवारी (ता.१७) सायंकाळी नागरिकांच्या सतर्कतेने पकडण्यात आले आहे. शहर पोलिसांनी तत्परता दाखवत दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे. पोलिसांनी ५८ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांकडून पाचशेच्या बनावट नोटा आणि भाजी विक्रेत्यांकडून सुटे करून घेतलेली रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथून एका रिक्षाने तीन संशयितांनी शहरातील कोटमगाव रस्त्यावरील भाजीपाला बाजारामध्ये येऊन लसूण, रताळे यांसारखा १०० ते २०० रुपयांचा भाजीपाला खरेदी केला आणि विक्रेत्यांना ५०० रुपयांची बनावट नोट देऊन उरलेले पैसे परत घेतले. हे संशयित एकापाठोपाठ अनेक ठिकाणी भाजीपाला खरेदी करत ५०० रुपयांच्या नोटा वटवत होते. यादरम्यान, बाजार समितीमध्ये पावती गोळा करणाऱ्या एका व्यक्तीने ही नोट बनावट असल्याचे ओळखले आणि इतर विक्रेत्यांना सतर्क केले. विक्रेत्यांना संशय आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. शहर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना बाजार परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तिसरा साथीदार गर्दीचा फायदा घेऊन फरार झाला आहे. संशयितांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या २९ हजाराच्या ५८ बनावट नोटा हस्तगत केल्या आल्या. त्यासोबत २७ हजार रुपये हे बदललेले मिळून आले आहेत. असे एकूण ५६ हजार रुपये त्यांच्याकडून ताब्यात घेतले आहे. अजून कुणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी दिली. श्री. मंडलिक, पोलिस हवालदार योगेश पाटोळे, अरविंद रायबोळे,अजित जगधने,सुनील अडांगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com