बनावट जाहिरात व्हायरल

बनावट जाहिरात व्हायरल
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी...मेन --- लोगो : ( धुळे जिल्हा परिषद लोगो वापरणे ) --- जिल्हा परिषद भरतीची बनावट जाहिरात व्हायरल तरुणांचा संभ्रम; दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १७ : ‘जिल्हा परिषद भरती २०२७’ या आकर्षक नावाखाली विविध विभागांतील रिक्त पदांचा एक तक्ता सध्या समाज माध्यमांवर वाऱ्यासारखा पसरत असून, यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये मोठा संभ्रम आणि खळबळ उडाली आहे. मात्र सद्यःस्थितीत अशी कोणतीही नोकरभरती प्रक्रिया राज्य शासन किंवा जिल्हा परिषदमार्फत सुरू नसल्याचे स्पष्ट करत व्हायरल झालेला हा तक्ता पूर्णपणे बनावट आणि कल्पोकल्पित असल्याचा खुलासा जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. समाज माध्यमांवर धुमाकूळ घालणाऱ्या या बनावट तक्त्यात एकूण ३०१ मंजूर पदे, २८२ भरलेली पदे आणि १९ रिक्त पदे असल्याची खोटी आकडेवारी पेरण्यात आली आहे. या बोगस तक्त्यात विविध २९ संवर्गांची माहिती दिली आहे. मात्र या आकडेवारीचा वास्तवाशी काडीमात्र संबंध नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाकडे सादर अहवाल जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्य शासनाकडे १ ऑक्टोबरअखेर संभाव्य सरळसेवा संवर्गातील पदांच्या स्थितीचा अहवाल सादर केला आहे. या अधिकृत नोंदीनुसार जिल्हा परिषद अंतर्गत एकूण एक १३० पदे मंजूर असून, पैकी ८६९ पदे कार्यरत आहेत. तर २६१ पदे प्रत्यक्षात रिक्त आहेत. यात आरोग्य पर्यवेक्षक (२ मंजूर, १ भरलेले, १ रिक्त), आरोग्य सेवक पुरुष (९९ मंजूर, सर्व भरलेले), आरोग्य सेवक महिला (२५७ मंजूर, १२६ भरलेले, १३१ रिक्त), औषध निर्माण अधिकारी (४२ मंजूर, ३९ भरलेले, ३ रिक्त), ग्रामपंचायत अधिकारी (३४१ मंजूर, २७० भरलेले, ७१ रिक्त), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (३७ मंजूर, २७ भरलेले, १० रिक्त), कनिष्ठ अभियंता यांत्रिकी (२ मंजूर, १ भरलेले, १ रिक्त) व कनिष्ठ आरेखक (१ रिक्त) यांचा समावेश आहे. तसेच कनिष्ठ यांत्रिक (१), कनिष्ठ लेखाधिकारी (२), कनिष्ठ सहायक (१०१), कनिष्ठ सहायक लेखा (११), जोडारी (१), तारतंत्री (१), पर्यवेक्षिका (२३), यांत्रिक (१), रिंगमन (१), लघुलेखक उच्च श्रेणी (१), वरिष्ठ सहायक लेखा (११), विस्तारधिकारी कृषी (६), पंचायत (४) व सांख्यिकी (७) ही सर्व मंजूर पदे शंभर टक्के भरलेली आहेत. पशुधन पर्यवेक्षक (३३ मंजूर, १८ भरलेले, १५ रिक्त), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (१८ मंजूर, १४ भरलेले, ४ रिक्त), लघुलेखक निम्न श्रेणी (१ रिक्त), वरिष्ठ सहायक (२१ मंजूर, १६ भरलेले, ५ रिक्त), विस्ताराधिकारी शिक्षण (२१ मंजूर, १६ भरलेले, ५ रिक्त) आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (८४ मंजूर, ७१ भरलेले, १३ रिक्त) अशी वास्तविक स्थिती आहे. --- १४-१ चौकट पेसा क्षेत्रात ३५६ पदे जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील सरळसेवा संवर्गाचा देखील १ ऑक्टोबरअखेरचा स्वतंत्र लेखाजोखाही प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. पेसा क्षेत्रात एकूण ३५६ मंजूर पदांपैकी २५९ पदे भरलेली असून, ९७ पदे रिक्त आहेत. यात आरोग्य सेवक पुरुष (७६ मंजूर, सर्व भरलेले), आरोग्य सेवक महिला (१४६ मंजूर, ५५ भरलेले, ९१ रिक्त), ग्रामपंचायत अधिकारी (१०७ मंजूर, १०४ भरलेले, ३ रिक्त), पर्यवेक्षिका (१४ मंजूर, सर्व भरलेले) आणि पशुधन पर्यवेक्षक (१३ मंजूर, १० भरलेले, ३ रिक्त) यांचा समावेश आहे. नोकरभरतीच्या नावाखाली समाज माध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या या बनावट जाहिराती आणि फसव्या तक्त्यांवर स्पर्धा परीक्षार्थींनी व नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये. अधिकृत माहितीसाठी केवळ शासनाच्या संकेतस्थळाचाच आधार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.