Nashik Crime : भोंदू खरातला पाचव्या गुन्ह्यात २३ पर्यंत कोठडी; बचावपक्षाचा जोरदार विरोध

महिलांवर अत्याचार प्रकरणातील पाचव्या गुन्ह्यामध्ये भोंदू अशोक खरात यास न्यायालयाने २३ तारखेपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
Ashok Kharat

Ashok Kharat

esakal

Updated on

नाशिक - महिलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील पाचव्या गुन्ह्यामध्ये भोंदू अशोक खरात यास न्यायालयाने २३ तारखेपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बचावपक्षाने पूर्वीच्या चारही गुन्ह्यांत एसआयटीने तपास करताना ज्या मुद्द्यांचा आधार घेतला त्याच आधारे पुन्हा कोठडी का मागत असल्याचा प्रश्न उपस्थित करीत जोरदार विरोध केला. दरम्यान, या वेळी खरातची न्यूरो सर्जनकडे तपासणी करण्याचीही विनंती खरातच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com