पान-१ मेन
VDH26B02653
इगतपुरी ः भाताचे दाणे भरण्याच्या अवस्थेत असतानाचे पीक.
-------------
५०-६
‘इंद्रायणी’चे मार्केट भेसळीमुळे धोक्यात
---------------
बनवेगिरी करत देतात स्थानिक मूळ तांदळाचा वास आणि आकार, शेतकऱ्यांचे नुकसान
---------------
सकाळ वृत्तसेवा
वाडीवऱ्हे, ता.१६ ः चांगल्या दर्जाच्या तांदळाचे आगार असलेल्या इगतपुरी तालुक्यातील तांदळाला यंदा भेसळीचे ग्रहण लागले आहे. येथील इंद्रायणी तांदळाची ख्याती राज्यभर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे काही मिलमध्ये व्यापाऱ्यांकडून थेट या तांदळाचीच नक्कल केली जात आहे. इतर राज्यातील दाणेदार तांदळावर प्रक्रिया करून तो इंद्रायणीच्या आकाराचा करून त्याला कृत्रिमरीत्या तसाच सुगंध दिला जात असल्याने स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावरून संतापलेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांची बाजार समितीचे संचालक संदीप गुळवे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता.२० ) बैठक बोलवली आहे.
---------------------
या बनावट इंद्रायणी तांदळामुळे ग्राहकांचेही नुकसान होत असून शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काही मिलमालक स्वार्थासाठी अस्सल इंद्रायणी तांदूळ उत्पादकांचे नुकसान करीत आहेत. शेतकऱ्यांच्याच निदर्शनास ही बाब आल्याने त्यांनी कडक भूमिका घेत आंदोलनाचा इशाराही दिला होता, त्यापार्श्वभूमीवर ही बैठक बोलविण्यात आली आहे, त्यामुळे बनावट इंद्रायणी तांदुळाचा विषय मार्गी लागावा अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.
---------------
इगतपुरी तालुक्यातील शेतकरी कृषी विद्यापीठाने शोधलेल्या सुवासिक, बारीक व चवदार तांदळाचे उत्पादन घेत आहे. कृषी खात्याने नवीन धानाचे सुधारित वाणांचे बियाणे शेतकऱ्याना उपलब्ध करून दिले. शेतकरीही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ लागले आहे. कृत्रिम वास दिलेला तांदूळ मूळ तांदळाच्या स्पर्धेत टिकत नसला तरी.यामुळे तालुक्यातील शेतकरी दुय्यम दर्जाचा तांदूळ पिकवितात असा गैरसमज पसरविला जात आहे, त्यामुळे स्थानिक तांदळाही चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा धान व सुवासिक तांदूळ विक्रीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
इगतपुरी तालुक्यात शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी विनोद नाठेसह तरुण शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. भेसळीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी भेसळमुक्त इंद्रायणी तांदूळ चळवळ सुरू केली आहे. एक वर्षांपासून विनोद नाठे शेतकऱ्यांचे प्रबोधन करीत आहे. व्यापारी व विनोद नाठे यांनी संदीप गुळवे यांची भेट घेऊन तांदळात होणाऱ्या भेसळीबाबत आपापली बाजू मांडली. व्यापारी व संदीप गुळवे यांनी व्यापारी, बाजार समिती सदस्य याबरोबर शेतकरी महत्त्वाचा घटक असल्याचे सांगत शेतकरी, व्यापारी व बाजार समिती सदस्यांची संयुक्त बैठक घ्यावी अशी मागणी करण्यात आली. या सूचनेची उपस्थितांनी आदर करत येत्या २० नोव्हेंबरला कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील हाॅलमध्ये शेतकरी, व्यापारी व बाजार समितीचे सदस्यांची संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नावर मार्ग काढण्यात येणार आहे.
----------
२०-२ चौकट
असा केला जातो बनावट इंद्रायणी
काही मिलमालक, व्यापारी शेजारच्या राज्यातून हलक्या प्रतिचा तांदूळ, धान खरेदी करून राइसमिल मिलमध्ये स्थानिक इंद्रायणी तांदळाच्या आकाराप्रमाणे तयार करून त्या तांदळाला इंद्रायणीप्रमाणे कृत्रिम सुवास दिला जातो. व्यापारी हाच तांदूळ इंद्रायणी म्हणून बाहेरच्या राज्यात पाठवतात, त्यामुळे साहजिकच स्थानिक तांदळाला पडेल त्या भावाने मागणी करत भाव पाडले जातात. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
-------------