Fake Medical Certificate Case : डॉ. सैंदाणे, डॉ. वास यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Fake Medical Certificate case
Fake Medical Certificate caseesakal
Updated on

नाशिक : बहुचर्चित पोलिसांच्या आंतरजिल्हा बदल्याप्रकरणी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांसंदर्भात नाशिक तालुका पोलिसात दाखल गुन्ह्यातील जिल्हा रुग्णालयाच्या तत्कालिन दोन्ही अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास व डॉ. निखिल सैंदाणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या (ता. १४) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी आहे. (Fake Medical Certificate Case Dr Saindane Dr vas bail application today Nashik News)

Fake Medical Certificate case
Nashik Crime News : जमिनीच्या वादातून पुतण्यानेच केला काकाचा खून; पोलिस तपासात उघड

त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, नवनियुक्त पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणाचा फेरआढावा घेतला आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक हिरा कनोज, जिल्हा रुग्णालयातील लिफ्टमन कांतीलाल गांगुर्डे, विरेंद्र यादव, विवेक ठाकरे यांना अटक केली आहे. खासगी डॉ. स्वप्निल सैंदाणे यास आरोग्याच्या कारणास्तव अटीशर्थींवर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. तत्कालिन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या कार्यकाळात उघडकीस आले होते.

परंतु गुन्हा दाखल करण्यापासूनच या प्रकरणी अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आल्याने संशय व्यक्त केला जात होता. दरम्यान, नवनियुक्त पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पदभार घेतल्यानंतर या प्रकरणाचा त्यांनी फेरआढावा घेण्याचे संकेत देतानाच, या प्रकरणात दोषी असतील त्यांच्याविरोधात कारवाई होईल असेही स्पष्ट केले. त्यामुळे याप्रकरणाच्या कारवाईबाबत पोलीस अधीक्षकांची भूमिका काय असेल याकडे पोलिस वर्तुळासह आरोग्य विभागाचेही लक्ष लागले आहे.

Fake Medical Certificate case
Nashik : चौकशीसाठी बोलविलेल्या तरूणाची आत्महत्त्या; विष घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Fake Aadhaar, PAN and Birth Certificate: Five Face Charges in Pune Identity Fraud Case
Suitcase Murder Case Cracked: Police Reveal Motive Behind Lover’s Killing
Yavatmal fake marriage case
minor girl assault case vita
Marathi News Esakal
www.esakal.com