नाशिक : बोगस कीटकनाशकांचा सुळसुळाट; शेतकऱ्यांची मोठी फसवणूक

Agriculture News
Agriculture Newsesakal

कसबे सुकेणे (जि.नाशिक) : जिल्ह्यामध्ये सध्या बोगस कीटकनाशके (Pesticides), कृषी औषधांचा धुमाकूळ सुरू असून या औषधांवर तातडीने बंदी आणावी अशी मागणी जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

परिसरात द्राक्षे आणि भाजीपाला संबंधित व्यवसाय वाढलेला आहे. त्यात प्रामुख्याने सर्व पिकांना रोगप्रतिबंधक औषधांची गरज मोठया प्रमाणात वाढली आहे. या पिकांना औषधी पुरवठा करणारे वितरकही मुबलक आहेत. गेल्या अनेक वर्षापासून शेतक-यांची या पिकांसाठी औषधांची गरज वाढली आहे. त्याचा फायदा घेत बोगस औषधी शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत. या बिगरबिलांच्या आणि विनापरवान्याच्या औषधांनी संधी साधली आहे. शेतक-यांची गरज लक्षात घेता कमी किंमतीत पण जास्त प्रभावी असल्याचे सांगितले जाते. हे एजंट आजही अंधारात पुरवठा करत आहे. या औषधांची कुठलीही गुणवत्ता, दर्जा न तपासता थेट शेतक-यांना देऊन शेतक-यांची व शासनाची फसवणूक होत आहे.

Agriculture News
ट्रकमध्ये कोंबून जनावरांची बेकायदा वाहतूक; ट्रकचालक, मालक गजाआड

या बोगस औषधांचा पुरवठा (स्त्रोत) कुठून होतो व वितरण कसे चालते याचे गूढ फक्त कृषी विभागालाच माहिती असू शकते. संपूर्ण कंटेनर नाशिक जिल्हयात सर्रास उतरतात, हा सगळा व्यवसाय कृषी विभागाच्या (Departement of Agriculture) अधिका-याच्या भागिदारी व आशिर्वादाशिवाय होऊ शकत नाही. काही वर्षापूर्वा जिल्हयाच्या ग्रामीण भागात या औषधांवर दिल्ली क्राईम ब्राच (Delhi Crime Branch) व मल्टीनॅशनल कंपन्यांनी संयुक्त छापे टाकत कारवाईचा फार्स केला. जिल्हयामध्ये औषधे वितरकांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे त्यांचीही दिशाभूल होत आहे. नाशिक जिल्हा डिलर्स असोसिएशन व महाराष्ट्र द्राक्ष बागाईतदार संघही याबाबत आवाज उठवित नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळे अशा या बोगस औषधांच्या विक्रीवर बंदीची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याकडून होत आहे.

Agriculture News
'कनेक्टिंग विथ चांदोमामा', अशक्यही शक्य करणारे निशांत बत्रा कोण?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com