Shalarth ID Scam
sakal
नाशिक: अमळनेर (जि.जळगाव) येथील खासगी शिक्षण संस्थेविरोधात बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाचे लाखो रुपयांचे अनुदान बेकायदेशीररित्या मिळविल्याप्रकरणी तपास सुरू होता. त्याअनुषंगाने संशयित अविनाश ऊर्फ पप्पू बळवंत पाटील आणि नीलेश निंबा पाटील या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव येथून अटक केले. या दोघांना न्यायालयाने ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.