सटाणा - बागलाण तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून ५० लाखांहून अधिक माया जमा करीत दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या युवकास सटाणा पोलिसांनी मोठ्या शिताफीने सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) येथून अटक केली..याबाबतची माहिती अशी : २०२३ मध्ये तलाठी परिक्षेत ''कोऱ्या उत्तरपत्रिका ठेवून या, पाल्यांना उत्तीर्ण करण्याची व त्यांना नोकरीचे आदेश काढून देण्याची जबाबदारी माझी'' अशी बतावणी सटाणा येथील रहिवासी व आदिवासी विकास विभागात नोकरीला असलेले प्रतीक मदन पाठक याने शहरासह तालुक्यातील अनेक सुशिक्षित पदवीधरांना चुकीची माहिती देत लाखो रुपये जमा केले. तलाठी पदासाठी परीक्षा झाल्यानंतर पाठक याने सांगितल्या प्रमाणे पैसे घेतलेल्या उमेदवारांनी उत्तरपत्रिका न सोडवता पेपर कोरे दिलेत. .वेळेत निकाल जाहीर झाल्यावर ज्या उमेदवारांकडून पाठक याने लाखो रुपये जमा केले होते. त्यांची नावे न आल्याने ते उमेदवार व त्यांच्या पालकांनी पाठक यांच्याकडे विचारणा केली असता, पाठकने उडवाउडवीची उत्तरे देऊन अंतिम यादी प्रसिद्ध होणे बाकी आहे. त्यात आपल्या पाल्यांची नावे येतील, अशी खात्री दिली. सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला, तरी देखील पाठक याच्या सांगण्यानुसार अंतिम यादी न लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे पालकांच्या लक्षात आले. .फसवणूक झालेले पालक पंचायत समितीचे माजी सभापती परशुराम आहिरे यांच्यासह नरेंद्र निंबा भामरे (लखमापूर), संतोष पोपट निकम (रा.पांढरूण मालेगाव), तुकाराम पुंडलिक शेवाळे (रा.चौगांव), राजेंद्र रामचंद्र खैरनार (सातपूर नाशिक) यांनी सटाणा पोलिसात धाव घेऊन प्रतीक मदन पाठक यांच्या खात्यावर आरटीजीएस सह चेक व रोख स्वरूपात नोकरीसाठी ५० लाखांहून अधिक रकमा देऊन त्यांनी आमची फसवणूक केली असल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार सटाणा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला..दोन वर्षांपासून शोधसंशयित प्रतीक पाठक दोन वर्षांपासून नाशिक, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नागपूर आदी शहरांमध्ये नाव बदलून वास्तव्यास राहून पोलिसांना चकवा देत होता. सटाणा पोलिस मागावर आहेत, याची जाणीव त्याला होती. पोलिसांनी कुरिअर फ्लिप कार्ड, अमेझॉन, बिग बास्केट आदी कंपन्यांची मदत घेऊन प्रतीक कोणत्या भागात व कोणत्या इमारतीत राहतो, याचा शोध घेतला. अखेर छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड शहरात तो असल्याची खात्री झाल्यावर सिल्लोडहून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रतीकच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय राऊत, पोलिस एन. बी. जगताप, वाय. के. शेवाळे, बी. ए. सूर्यवंशी, आर. एम. शिंदे, एस. बी. कदम यांनी सिल्लोड येथून पाठकला उचलून आणले. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.